Harbhajan Singh Retires: क्रिकेटला अलविदा करणारा हरभजन सिंह राजकारणात येणार? म्हणाला - मला अनेक पक्षांकडून ऑफर
काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनीही हरभजन लवकरच काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी हरभजनसोबतचा एक फोटोही ट्विट केला होता. मात्र या सगळ्या चर्चेवर हरभजनने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजनने त्याचा कारकिर्दित भारताला अनेक सामने जिंकुन दिले आहे. किक्रेटला अलविदा केल्यानंतर हरभजन सिंह पुढे आपल्या आयुष्याची कोणती नवीन इंनिग सुरु करणार या सगळया कडे सर्वानचं लक्ष लागुन आहे. दरम्यान, हरभजननं पंजाब निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीची घोषणा केल्यानं तो राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका पार पडणार आहेत. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनीही हरभजन लवकरच काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी हरभजनसोबतचा एक फोटोही ट्विट केला होता. मात्र या सगळ्या चर्चेवर हरभजनने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
Tweet
हरभजन म्हणतो, 'मी प्रत्येक पक्षातील राजकारण्यांना ओळखतो. मी कोणत्याही पक्षात सामील झालो तर त्याची अगोदर घोषणा करेन. मी पंजाबची सेवा करणार, कदाचित राजकारणातून किंवा काहीतरी करून. अद्याप माझा कोणताही निर्णय झालेला नाही, मी याबाबत काहीही विचार केलेला नाही. मला वेगवेगळ्या पक्षांकडून सहभागी होण्याच्या ऑफर आल्या आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांना मी क्रिकेटर म्हणून भेटलो होतो. मला कोणत्या दिशेने जायचे आहे, हे जाणून घेण्यासाठी मला दोन-तीन दिवस हवे आहेत. होय, मला समाजाला परत करायचे आहे.' (हे ही वाचा ‘Virat Kohli चे राहुल द्रविडशी संबंध दीर्घकाळ चांगले राहतील वाटत नाही,’ जाणून घ्या असे का म्हणाला माजी पाकिस्तानी क्रिकेटर.)
Tweet
हरभजनची सिंहची कारकिर्द
हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)