Goa Assembly Elections 2022: पणजी मधून उत्पल पर्रिकर यांच्याविरोधातील शिवसेनेची उमेदवारी मागे; संजय राऊत यांचं ट्वीट

संजय राऊतांनी केलेल्या ट्वीट मध्ये आपण पणजीतील शिवसेना उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांची उमेदवारी मागे घेत असून पणजीतील शिवसैनिक देखील उत्पल पर्रीकर यांच्या मागे उभे करत असल्याचं म्हटलं आहे

Sanjay Raut (Photo Credits: PTI)

गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये (Goa Assembly Elections) यंदा अनेक मोठे धमाके झाले आहेत. भाजपाने मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पणजीमधून (Panaji) तिकीट नाकरल्यानंतर आता त्यांना बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. राजकीय पटलावरील या खेळामध्ये शिवसेनेही (Shiv Sena)  भाजपाला चेकमेट देण्यासाठी आपला उमेदवार मागे घेत उत्पल पर्रिकर यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. दरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे.

संजय राऊतांनी केलेल्या ट्वीट मध्ये आपण पणजीतील शिवसेना उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांची उमेदवारी मागे घेत असून पणजीतील शिवसैनिक देखील उत्पल पर्रीकर यांच्या मागे उभे करत असल्याचं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी याद्वारा आम्ही गोव्यातील राजकारणाचं शुद्धिकरण करत असल्याचंदेखील म्हणत भाजपाला चपराक लावली आहे. काही दिवसांपूर्वीच उत्पल पर्रीकरांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्या मध्ये चर्चा देखील झाली पण ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे अखेर भाजपाला राम्मराम ठोकत उत्पल पर्रिकर यांनी पणजी मध्ये अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

उत्पल पर्रिकर हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपूत्र आहेत. हे देखील नक्की वाचा: Goa Assembly Polls 2022: आदित्य ठाकरे गोव्यात प्रचारासाठी उतरणार, शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकर यांच्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची संजय राऊत यांची घोषणा .

संजय राऊत ट्वीट

14 फेब्रुवारीला गोव्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. तर याचा निकाल 10 मार्च दिवशी लागणार आहे.