Ghulam Nabi Azad Becomes Modi Fan: पंतप्रधान नरेंद्र मोदी उदार असल्याचा असल्याचा गुलाम नबी आजाद याना साक्षात्कार; तोंडभरुन कौतुक
काँग्रेसचे माजी खासदार राहिलेल्या गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी जे करत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे. मोदी हे 'उदार' मानूष्य आहेत. आपण विरोधी पक्षनेते असताना मोदींना अनेकदा विरोध केला आहे.
Ghulam Nabi Azad On Narendra Modi: गुलाम नबी आजाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार 'फॅन' (Ghulam Nabi Azad Becomes Modi Fan) झाले आहेत. काँग्रेसचे माजी खासदार राहिलेल्या गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी जे करत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे. मोदी हे 'उदार' मानूष्य आहेत. आपण विरोधी पक्षनेते असताना मोदींना अनेकदा विरोध केला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे असो किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायदा असो अथवा हिजाबचा वाद असो, प्रत्येक वेळी आपण मोदींवर जोरदार टीका केली. त्यांना विरोध केला. पण असे असतानाही त्यांनी राजकीयदृष्ट्या त्यांच्याविरुद्ध कधीही हिंसक वृत्ती दाखवली नाही, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
गुलाम नबी आजाद यांनी 2022 मध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढला. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. त्यांच्यासोबत जम्मू-कश्मीर मधील काही काँग्रेस नेत्यांनीही काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र, त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुथीसुमने उधळल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. गुलाम नबी आजाद यांचे आत्मचरित्र वाचकांच्या भेटीला येत आहे. येत्या बुधवारी हे आत्मचरित्र प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. दरम्यान, या आत्मचरित्रात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. (हेही वाचा, Ghulam Nabi Azad: मी माझ्या पक्षाला हिंदुस्थानी नाव देईन, गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा)
गुलाम नबी आजाद यांचा परिचय
गुलाम नबी आजाद हे भारतीय राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 7 मार्च 1949 रोजी जम्मू आणि काश्मीर, भारत येथे झाला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि त्यांनी सरकारमध्ये विविध पदांवर काम केले होते. खास करुन संसदेच्या वरच्या सभागृहाचे ते काँग्रेसकडून प्रदीर्घ काळ प्रतिनिधीराहिले आहेत.
गुलाम नबी आजाद यांनी 1970 च्या दशकात एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली आणि 1988 मध्ये ते जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. 1980 मध्ये ते भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेवर निवडून आले. काँग्रेसने पुढे त्यांना राज्यसभेवर संधी दिली. त्यांनी विरोधी पक्षनेते पदही भूषवले.
आझाद यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि शहरी विकास मंत्री यासह सरकारमध्ये विविध पदे भूषवली आहेत. 1990 पासून ते भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
ट्विट
आपल्या राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त, आझाद यांनी सामाजिक कार्यात, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर या त्यांच्या मूळ राज्यात अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली आहेत आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम केले आहे.
आझाद त्यांच्या संयत विचारांसाठी ओळखले जातात आणि ते अनेकदा धार्मिक अतिरेकी आणि सांप्रदायिकतेच्या विरोधात बोलले आहेत. सार्वजनिक सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.