Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालामध्ये Times Now-C-Voter च्या अंदाजानुसार महागठबंधन च्या पारड्यात 120 तर NDA कडे 116 जागा 

तर युपीए मध्ये तेजस्वी यादवच्या आरजेडी कडे 85 जागा असतील त्यांच्याखालोखाल कॉंग्रेसकडे 25 आणि डाव्यांकडे 10 जागा असू शकतात. दरम्यान अन्य 6 जागांवर आणि चिराग पासवान यांचा एलजेपी एका जागेवर विजयी होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणूकीसाठी (Bihar Elections)  टाईम्स नाऊ (Times Now) ने यंदा सी व्होटर्स (C Voters) सोबत एक्झिट पोल (Exit Polls) घेतले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, भाजपा नेतृत्त्वातील  एनडीएकडे (NDA)  116 जागा तर महागठबंधनकडे (Mahagathbandhan) 120 जागा जाण्याची शक्यता आहे. तसेच एलजेपी (LJP) कडे 1  आणि अन्य 6 जागांवर जिंकू शकतात.  एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, युपीएकडे (UPA) मतांची आघाडी असेल तर  एनडीए (NDA) दुसर्‍या स्थानावर असेल. मात्र ही अगदीच  अटीतटीची लढाई असेल. त्यांच्यामध्ये केवळ 4 -5 जागांवरून कांटे की टक्कर असेल. दरम्यान अन्य पक्षांच्या पारड्यात बिहारच्या जनतेने 7 जागा दिल्या आहेत. भाजपामधून बाहेर पडलेल्या चिराग पासवानला यंदा अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी 122 जागांची गरज आहे. Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Times Now: इथे पहा टाईम्स नाऊ- सी व्होटरचे एक्झिट पोल निकाल

Times Now-C-Voter चे एक्झिट पोल निकाल अंदाज काय सांगतात?

एनडीए मध्ये जेडीयूला 42, भाजपाला 70, हम ला 2, व्हिआयपीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर युपीए मध्ये तेजस्वी यादवच्या आरजेडी कडे 85 जागा असतील त्यांच्याखालोखाल कॉंग्रेसकडे 25 आणि डाव्यांकडे 10 जागा असू शकतात. दरम्यान अन्य 6 जागांवर आणि चिराग पासवान यांचा एलजेपी एका जागेवर विजयी होण्याची शक्यता आहे. 

बिहारची विधानसभा निवडणूक 243 जागांवर झाली आहे. तीन टप्प्यामध्ये यात मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात म्हणजेच 28 ऑक्टोबरला 71, 3 नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यात 94 तर आज तिसर्‍या टप्प्यात 78 जागांवर मतदान पार पडले आता याचा अंतिम निकाल 10 नोव्हेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.