दुहेरी नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचीका

दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी या याचिकेत कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.

Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करुन त्याबाबतच्या चौकशीची मागणी सोर्वोच्च न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. तसेच, राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उमेदवारी करण्यासही मज्जव करण्यात यावा अशी मागणिही याचिकेत केली होती. राहुल यांनी इंग्लंडचे नागरिकत्व (UK citizenship) घेतल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता, या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) काय निर्णय देते याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी या याचिकेत कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.

याचिकेद्वारे राहुल गांधी यांच्यावर असलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. दोन मे रोजीच ही मागणी करण्यात आली होती. दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाणे जय भगवान गोयल आणि सीपी त्यागी यांच्या याचिकेवर इतकाच उल्लेख केला होता की, 'आम्ही यावर विचार करु'.

या याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले होते की, काँग्रेस अध्यक्ष द्वारा स्वच्छेने ब्रिटीश नागरिकत्वाचा स्वीकार करण्याच्या प्रश्नावर भाजप नेते सुब्रमणियन स्वामी यांनी नोव्हेंबर 2015 च्या या प्रकरणावर केंद्र आणि निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर आपण असंतृष्ट आहोत. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे औरंगजेब- संजय निरुपम (Video))

दरम्यान, गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना एक नोटीस पाठवून त्यांच्या नागरिकत्वासंबंधी आलेल्या तक्रारीबाबत आणि उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाबाबत येत्या पंधरवड्यात वास्तव स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif