धुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता; कमळ फुलले, आमदार अनिल गोटे गटाचा धुव्वा
काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले होते.
Dhule Municipal Corporation Election 2018 Poll Results: धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने क्रमांक एकचा पक्ष ठरत सत्तेचे कमळ एकहाती फुलवले आहे. धुळे महापालिकेत एकूण 74 जागांपैकी भाजप 50, शिवसेना 02, आघाडी 14, एमआयएम 4, इतर 3, तर अनिल गोटे गटाला केवळ 1 जागा मिळाली. धुळ्यात कमळ फुलल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि भाजपची धुळ्यात ताकत वाढली आहे. तर, आमदार अनिल गोटे गटाला मात्र, जोरदार धक्का मिळाला आहे.
प्राथमिक कल हाती आले तेव्हाच धुळे महापालिका निवडणुक निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. प्राथमिक कल हाती आला धुळे महापालिकेत एकूण 74 जागांपैकी भाजप 31, शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे. तर, अनिल गोटेंचा लोकसंग्राम 3, आघाडी 28 तर इतर (अपक्ष )2 जागांवर आघाडीवर होते. पुढे थोड्याफार फरकाने हेच चित्र कायम राहिले. (हेही वाचा, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018: सविस्तर जाणून घ्या जनमताचा कौल)
धुळे महानगरपालिका निवडणूकीत ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले होते.