Delhi Assembly Election Results 2020 Highlights: मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवण्याची महाराष्ट्र आपची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70 जागांसाठी सुमारे 672 उमेदवार रिंगणात होते. आठ फेब्रुवारी या दिवशी इथे मतदान पार पडले. दरम्यान, मतदानाची वेळ संपताच त्याच दिवशी (8 फेब्रुवारी) सायंकाळी दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2020 चे निकालही जाहीर झाले.

12 Feb, 04:27 (IST)

महाराष्ट्रात आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आप आपले उमेदवार उभे करणार आहे. विशेषत:मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे आपने स्पष्ट केले.आहे.

12 Feb, 03:11 (IST)

मंगळवारी, दिल्लीत बहुमताने आप पक्षाचा विजय झाल्यावर, आता पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भावी कार्यवाही निश्चित करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. 

12 Feb, 02:10 (IST)

अरविंद केजरीवाल आणि आप पक्षाने पुन्हा एकदा दिल्लीमध्ये विजय प्राप्त केला आहे. भाजप आणि कॉंग्रेससारख्या मोठ्या पक्षांना हरवत आपने मिळवलेला हा विजय वाखाणण्याजोगा आहे. आपने आतापर्यंत 55 जागा मिळवल्या आहेत, भाजपने 1 तर कॉंग्रेसला पुन्हा एकदा एकाही जागा मिळाली नाही. अशात सुभाष चोप्रा यांनी दिल्ली कॉंग्रेस प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

12 Feb, 01:26 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची जादू चालली. अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील हे निश्चित झाले आहे. मागील निवडणुकांप्रमाणे या वेळीही या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला खाते उघडता आले नाही.

अशात पटपड़गंज येथून सलग तिसऱ्यांदा आमदार निवडून आलेले मनीष सिसोदिया व आपच्या इतर कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

12 Feb, 24:49 (IST)

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आप व अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्वीट मध्ये नितीन गडकरी म्हणतात, 'मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. हरणे-जिंकणे हा निवडणुकीचा भाग आहे, आता आम्ही आमची कामे आणि मुद्दे अधिक दृढतेने लोकांसमोर ठेवू. लोकशाहीमध्ये लोकांचा निर्णय हा अंतिम आहे, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालजी यांचे अभिनंदन.'

12 Feb, 24:10 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ताज्या अपडेट्स नुसार आप 62 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहेत. अशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

 

11 Feb, 23:34 (IST)

कनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरामध्ये आप प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी हनुमान मंदिरामध्ये घेतलं दर्शन आहे.  यावेळेस अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता देखील हजर होत्या.

11 Feb, 22:48 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालामध्ये आज इमरान हुसेन बालीमरन विधानसभा मतदारसंघातून 36,172 तर सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश मधून 16,809  आणि राज कुमारी ढिल्लन हरी नगर मधून 20,131 मतांनी विजयी झाले आहेत. 

11 Feb, 22:40 (IST)

अरविंद केजरीवाल आज दिल्लीमध्ये डबल सेलिब्रेशन करत आहेत. आपच्या घवघवीत यशासोबतच आज त्यांच्या पत्नी सुनिता यांचा वाढदिवस आहे. दरम्यान आज वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान राजकारण हे 'समस्या', 'प्रश्न' यांच्याभोवती असावं आरोप-प्रत्यारोपांच्या टीपण्णीवर नसावं असं मत व्यक्त केलं आहे. 

11 Feb, 22:18 (IST)

दिल्ली निकालाचा स्वीकार करतो असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आप नेते अरविंद  केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान भाजपाच्या पराभवाचं चिंतन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

11 Feb, 21:53 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये मतदारांनी निर्भिडपणे केलेल्या मतदान केलेल्या दिल्लीवासीयांचे कौतुक करताना अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

11 Feb, 21:44 (IST)

आप नेते अब्दुल रेहमान सीलामपूर विधानसभा मतदारसंघातून 27,887 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपाच्या कौशल कुमार यांचा पराभव केला आहे.

11 Feb, 21:11 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर आप नेते अरविंद केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. यावेळेस दिल्लीवासीयांनी विकासाच्या पाठीशी उभं राहत नव्या राजकारणाला जन्म दिला असल्याचं  सांगत देशासाठी हा शुभ संदेश असल्याचं सांगितलं आहे. तसेच हा केवळ दिल्लीचा नव्हे तर भारत मातेचा विजय असल्याचं म्हटलं आहे. 

11 Feb, 20:57 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन करताना मतदारांनी देश 'जन की बात' ने चालतो  'मन की बात' ने नव्हे असं म्हणत भाजपाला टोला लगावला आहे.

11 Feb, 20:35 (IST)

मनीष सिसोदीया पुन्हा आघाडीवर आल्यानंतर त्यांनी विक्टरी साईन दाखवत आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना पटपरगंज विधानसभा मतदारसंघातूम आमदार होताना आनंद होतोय.  भाजपाने द्वेषाचं राजकारण केलं असलं तरीही मतदारांनी विकासाचं सराकर निवडलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलं आहे.  

11 Feb, 20:14 (IST)

शरद पवारांनी दिल्ली विधानसभेतील आम आदमी पार्टीच्या विजयाचं अभिनंदन करताना या निकालाचं आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलं आहे. तर भाजपाच्या पराभवाची मालिका थांबणार नाही असंदेखील म्हटलं आहे.  

11 Feb, 19:54 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये पटपरगंज मतदार संघातून 13 व्या फेरीनंतर आप नेते आणि दिल्ल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा आघाडी मिळवली आहे. मनीष सिसोदिया 13 व्या फेरीत 3129 मतांनी आघाडीवर आहेत.

11 Feb, 19:49 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालामध्ये आप कडे स्पष्ट बहुमत आहे. पण आता कलांच्या पाठोपाठ निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. विश्वासनगर मतदारसंघातून दीपक सिंग यांनी  बाजी  मारली आहे. 

11 Feb, 19:41 (IST)

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनिता सोबत आपच्या विजयाचं सेलिब्रेशन सुरू केलं आहे. त्यांनी केक कापून विजय साजरा केला आहे. 

11 Feb, 19:32 (IST)

दिल्लीमध्ये आपचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 10 व्या फेरीनंतर पुन्हा पिछाडीवर पडले होते. रवी नेगी आणि मनीष सिसोदिया यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू आहे. 11 व्या फेरीनंतर मनीष सिसोदिया 700 हून अधिक मतांनी पुन्हा आघाडीवर आले आहे. 

Read more


Delhi Vidhan Sabha Election Results 2020 Live News Updates: दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2020 प्रसिद्ध होण्यास काहीच वेळात सुरुवात होणार आहे. देशभरातील नागरिकांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. सीएए, एनआरसी, शाहीनबाग, हिंदू-मुस्लिम, नागरिकता यांसर अर्थव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था अशा एक ना अनेक मुंद्द्यांची दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 प्रचारामध्ये चर्चा झाली होती. सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्या आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भाजप (BJP) उमेदवारांसाठी दिल्लीभर प्रचार केला होता. देशभरातील प्रसारमाध्यमांनीही या निवडणुकीचे वार्तांकन करताना या निवडणुकीस प्रचंड महत्त्व दिले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणूक मतमोजणी 2020 मध्ये दिल्लीकर जनता कोणाच्या बाजून मत देते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70 जागांसाठी सुमारे 672 उमेदवार रिंगणात होते. आठ फेब्रुवारी या दिवशी इथे मतदान पार पडले. दरम्यान, मतदानाची वेळ संपताच त्याच दिवशी (8 फेब्रुवारी) सायंकाळी दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2020 चे निकालही जाहीर झाले. विविध प्रसारमाध्यमसमूह आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सच्या निकालानुसार दिल्लीत आम आदमी पक्ष पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर परतण्याची मोठी शक्यता आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी आम आदमी पक्षास पूर्ण बहुमताने सत्ता मिळेल असे भाकीत केले आहे. तर, केंद्रात सत्तेवर असलेली भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहील असे म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक मतमोजणीचे ठळक आणि ताज्या घडामोडी आम्ही इथे खास आपल्यासाठी देणार आहोत. म्हणूनच या घडामोडी आणि ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी आपण लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा. इथे आम्ही आपल्याला दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष, त्या पक्षाचे उमेदवार त्याला मिळालेली मते, विजयी उमेदवार, मोठ्या फरकाने पाठिमागे असलेले उमेदवार या सर्वांची माहिती देणार आहोत. म्हणूनच या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह अपडेट्स पाहात राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now