दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाची 5 महत्त्वाची कारणं
दरम्यान, भाजपच्या पराभवास पुढील काही कारणे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
विधासभा निवडणूक निकाल 2020 (Delhi Vidhan Sabha Election Results 2020) जाहीर झाले आहेत. जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) दोन्हीवर विश्वास ठेवत दिल्लीची किल्ली पुन्हा त्यांच्याकडेच दिल्ली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष विरोधात भाजप (BJP) प्रबळ दावेदार होता. काँग्रेस तसाही तुलनेत नव्हताच. या निवडणुकीत मागच्या तुलनेत भाजपची विजयी उमेदवारांची संख्या वाढली असली तरी भाजपचा मोठा प्रराभव होताना दिसत आहे. या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजप शासीत राज्यातील मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते. असे असले तरीही आपसमोर भाजप पराभूत झाला. राजकीय विश्लेषकांच्य मते हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा निवडणुकीत झालेला पराभव आहे. दरम्यान, भाजपच्या पराभवास पुढील काही कारणे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रीय मुद्द्यांचा फारसा प्रभाव नाही
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने खास करुन राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेतला. जसे की, सीएए, एनआरसी, देशभक्ती वैगेरे वैगेरे... काही ठिकाणी जय श्रीराम घोषणाही पाहायला मिळाल्या. देशभक्तीच्या मुद्दा तर भाजपकडून इतका तापविण्यात आला की, भाजप खासदार अनुसार ठाकूर यांनी 'देश के गद्दारों..को... ** मारो... ** को' अशा घोषणा दिल्या. दरम्यान, इतके होऊनही दिल्लीच्या जनतेने राष्ट्रीय मुद्द्यांना विधानसभा निवडणुकीत भारसा भाव दिला नाही. परिणामी भाजपच्या पराभवात राष्ट्रीय मुद्द्यांचा वापर हेही कारण ठरला.
भाजप केवळ शेवटच्या 15 दिवसात दमदार प्रचार
दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याच्या आधीपासूनच आम आदमी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते इलेक्शन मोडमध्ये गेले होते. दुसऱ्या बाजूला भाजप मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक फारसा गांभीर्याने घेताना दिसत नव्हता. मात्र, शेवटच्या 15 दिवसांमध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतली. भाजप नेते आणि कार्यकर्ते सक्रीयपणे प्रचाराला लागले. सक्रियतेत आक्रमकता, राष्ट्रीय मुद्दे आणि देशभक्ती अशा मुद्द्यांचा वापर झालेला दिसला. (हेही वाचा, दिल्ली: भाजपला धक्का, 'आप'ला फायदा; दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले राष्ट्रीय मुद्दे)
स्टार प्रचारकांची फौज मात्र विस्कळीतपणा कायम
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कागदावर बरेच नियोजन केले होते. त्यानुसार भाजपने प्रचाराचा धडाका उडवून द्यायचाही प्रयत्न केला. मात्र, असे असूनही भाजपला प्रचारात सूत्रबद्धता आणता आली नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे कव्हरेज देणारे अनेक पत्रकार आणि राजकीय निवडणूकांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते सांगतात की, भाजपकडे स्टार प्रचारकांची तगडी फौज होती. मात्र, त्यात बराच विस्कळीतपणा होता. अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांनाही हे माहित नसायचे की, प्रचारासाठी कोण वक्ता बोलण्यासाठी येणार आहे.
'आप'चे आव्हान पेलले नाही?
आम आदमी पक्षाने सत्तेत आल्यानंर जे काम केले ते जनतेपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवले. केलेल्या कामाच्या आधारेच आम आदमी पक्षाने निवडणूक प्रचारात मतं मागितील. आम आदमी पक्षने उभा केलेली भींत भाजपला तोडता आली नाही. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मुद्द्यांवर भाजपने फारसे भाष्यच केले नाही. त्याऊलट भाजपने सीएए, एनआरसी, देशभक्ती, असे राष्ट्रीय मुद्दे हाती घेतले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात आघाडी घेऊनही भाजपला 'आप'चे आव्हान पेलले नाही, अशी राजकीय चर्चा आहे.
दिल्लीची जनता स्वतंत्र विचार करते
आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात मतदारांना अनेक मुद्द्यांवरुन आकर्षीत करण्याचा प्रयत्न झाला. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजप शासीत राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विविध नेते दिल्लीबाहेरून आणले. दिल्लीमध्ये बाहेरुन आलेल्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपने ही खेळी केली. परंतू, आपल्या प्रदेशाच्या नेत्यांकडे पाहून मते देण्यापेक्षा दिल्लीच्या जनतेने स्वतंत्र विचार करुन मते दिल्याचे दिसते. त्यामुळेच कदाचीत इतर राज्यातून आणलेल्या नेत्यांचा दिल्लीकरांवर भाजपला प्रभाव टाकता आला नसावा.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी, भाजपला मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी पाहिली तर त्यात नक्कीच वाढ झाली आहे. गतवेळच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्याही काहीशी वाढली आहे. त्यामुळे भाजपचा निवडणुकीच्या रिंगणात पराभव झाला असला तरी, जनाधार वाढण्यात भाजप यशस्वी झाल्याचे चित्र काही प्रमाणात रंगवता येऊ शकते.