DK Shivakumar Arrest: डीके शिवकुमार यांच्या अटकेविरोधात कॉंग्रेसकडून उद्या कर्नाटक बंदची हाक, राज्यव्यापी विरोध प्रदर्शन जाहीर

के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अटक केली. शिवकुमार यांच्या अटकेनंतर कर्नाटक काँग्रेसने उद्या राज्यव्यापी निदर्शने करणार आहे. युवा कॉंग्रेस उद्या सकाळी 10 वाजता बंगळुरु येथे निषेध नोंदवेल.

डीके शिवकुमार (Photo Credits: IANS)

कर्नाटक काँग्रेसचे संकट मोचक अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यावर आता संकट ओढवले आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून त्यांना आज अटक करण्यात आली आहे. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अटक केली. ईडीचे अधिकारी गेले चार दिवस आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी त्यांची चौकशी करत होते आणि आता अखेर मंगळवारी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. कॉंग्रेसने याला राजकीय प्रतिस्पर्धी कृत्य म्हणून संबोधले आणि आरोप केला की हे सरकारच्या अपयशावर आणि 'आर्थिक आपत्कालीन परिस्थिती' लपविण्याच्या प्रयत्नात केले गेले आहे. मागील वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिगविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे शिवकुमार यांच्या विरोधात काही प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत. (कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना Money Laundering प्रकरणात ED कडून अटक)

शिवकुमारवर हवालामार्फत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, शिवकुमार यांच्या अटकेनंतर काँग्रेसकडून कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. आणि काँग्रेसने उद्या राज्यव्यापी निदर्शने जाहीर केली आहेत. युवा कॉंग्रेस उद्या सकाळी 10 वाजता बंगळुरु येथे निषेध नोंदवेल. दुसरीकडे, शिवकुमार यांच्या समर्थकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरु आहे. यामुळे, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दिल्लीत डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी केला जोरदार हंगामा:

ईडीने नोव्हेंबर 2018 मध्ये शिवकुमार यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु गुरूवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. आता त्यांना ईडीने अटक केली आहे. मागील वर्षी आयकर विभागाच्या एका चार्जशीटच्या आधारे ईडीने शिवकुमार आणि ईतरांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.