Sambhaji Raje : गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्मितीबाबत छत्रपती संभाजीराजेंची शिंदे सरकारकडे मागणी
राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा किमान महामंडळाची निर्मितीबाबत विशेष मागणी संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजेराजेंचं (Sambhaji Raje) गड किल्ले आणि त्यांच्या संवर्धनावर विशेष प्रेम आहे. त्यांचं हे प्रेम त्यांच्या शब्दातूनचं नाही तर कृतीतून देखील कायम दिसुन येतं. राज्यातील विविध गडावर संभाजीराजे खुद्द भेट देतात. तसेच आता गडकिल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी नवनिर्वाचीत शिंदे सरकारकडे (Maharashtra Government) विशेष मागणी केली आहे. छत्रपती संभाजेराजेंकडून राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. किंवा संबंधित मंत्रालय नाही तरी किमान महामंडळाची निर्मिती करावी ज्यातून दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे सहज शक्य होईल, अशी मागणी छत्रपती संभाजेराजेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्राचा (Maharashtra) ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर गडकिल्यांच्या संवर्धनासाठी लवकरात लवकर पाऊल उचलणे गरजेचं आहे, असं छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच विविध गडाच्या तटबंदीला फुग आली असून लक्ष न दिल्यास तटबंदी ढासळण्याची शक्यता संभाजीराजेंनी वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे, तरी याकडे जातीनं लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत छत्रपती संभाजी राजेंनी व्यक्त केलं आहे. (हा ही वाचा :-Sanjay Raut: 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी)
दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची (Vijaydurg Fort) तटबंदी ढासळली होती. तेव्हा विजयदुर्ग किल्ल्यास खुद्द छत्रपती संभाजी राजेंनी भेट देत पुरातत्व खात्याकडून संबंधित काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. पण तरीही दोन वर्षात त्याबद्दल काहीही काम केलं गेलं नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार (Central Government) यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालाव अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा किमान महामंडळाची निर्मितीबाबत विशेष मागणी संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे.