Lok Sabha and Vidhan Sabha By-Elections: लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा; जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट

उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड या लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पक्षाने भोजपुरी स्टार दिनेश लाल निरहुआ (Dinesh Lal Yadav) यांना आझमगड (Azamgarh) मधून उमेदवारी दिली आहे, तर घनश्याम लोधी (Ghanshyam Lodhi) यांना रामपूरमधून तिकीट दिले आहे.

BJP | (File Image)

Lok Sabha and Vidhan Sabha By-Elections: भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड या लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पक्षाने भोजपुरी स्टार दिनेश लाल निरहुआ (Dinesh Lal Yadav) यांना आझमगड (Azamgarh) मधून उमेदवारी दिली आहे, तर घनश्याम लोधी (Ghanshyam Lodhi) यांना रामपूरमधून तिकीट दिले आहे. त्रिपुरातील बोर्डोली शहरातून भाजपने प्रा माणिक साह (Manik Saha) यांना उमेदवारी दिली आहे. आगरतळामधून डॉ. अशोक सिंघा यांनी सुरमामधून स्वप्ना दास पॉल आणि जुबराजनगरमधून मलिना देबनाथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेशात भाजपने आत्मूकरमधून गुंडलापल्ली भरत कुमार यांना उमेदवारी दिली आहे. राजेश भाटी यांना देशाची राजधानी दिल्लीतील राजिंदर नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. झारखंडमधील मांडेरमधून गंगोत्री कुजूर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्तार अब्बास नक्वी यांना रामपूरमधून तिकीट मिळणार असल्याची अटकळही संपुष्टात आली आहे. राज्यसभेत दुर्लक्ष केल्यास त्यांना रामपूरमधून तिकीट दिले जाऊ शकते, असे यापूर्वी बोलले जात होते. मात्र, तसे झालेले नाही. घनश्याम लोधी यांना रामपूरमधून तिकीट मिळाले आहे. (हेही वाचा - Rahul Gandhi On Central Govt: राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीका, म्हणाले - घराचा पत्ता कल्याण मार्ग असा ठेवल्याने कोणाचाही फायदा होत नाही)

दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने राजेश भाटिया यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाने दुर्गेश पाठक यांना आधीच उमेदवार घोषित केले आहे. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 23 जूनला मतदान होणार असून 26 जूनला निकाल लागणार आहे.

आझमगड आणि रामपूर लोकसभा जागांवर पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काँग्रेसचे संघटन नसल्याने या दोन जागांवर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाने राज्यात झालेल्या पोटनिवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात अद्याप पक्षाची संघटना नसल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत पक्ष संघटनेला राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now