Asaduddin Owaisi On India VS Pakistan: भारत उद्या पाकिस्तान विरुध्द मॅच का खेळतोय? मॅच देशापेक्षा मोठी आहे का? एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींचा सवाल
जितक्या वेळा पाकिस्तानचा उल्लेख हे करतात तेवढा तर आम्ही आमच्या संपूर्ण जीवनात केला नसेल, असा मिश्कील टोला एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin Owaisi) भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्यावर सवाल उपस्थित करत मिश्कील टोला लगावला आहे. ओवैसी म्हणाले भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पाकिस्तान विरुध्द खेळायला पाकिस्तानात जात नाहीत मात्र ऑस्ट्रेलियात (Australia) जावून खेळतात. खेळाचं नसेल तर कुठेही खेळू नये. मॅच देशापेक्षा मोठी आहे का? जर देश महत्वाचा असेल तर भारताने पाकिस्तान विरुध्द खेळूच नये असं वक्तव्य केलं आहे. तसेच भारत पाकिस्तान सोबत खेळला नाही तर फार फार तर टेलिव्हिजन वाहिन्यांचे (TV Channels) हजार दोन हजार कोटीचे नुकसान होईल. जितक्या वेळा पाकिस्तानचा (Pakistan) उल्लेख हे करतात तेवढा तर आम्ही आमच्या संपूर्ण जीवनात केला नसेल, असा मिश्कील टोला एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, या सामन्यात भारताला विजय मिळावा अशी माझी देखील इच्छा आहे. दरम्यान ओवैसी यांनी पराभवानंतर मुस्लिम खेळाडूंच्या (Muslim Cricket Players) ट्रोलिंगचा (Trolling) मुद्दा देखील उपस्थित केला. ओवैसी म्हणाले, विजयानंतर देशात मोठा जल्लोष केला जातो, खेळाडूंचे कौतुक केले जाते. परंतु पराभावानंतर मात्र चूका शोधल्या जातात. खेळाडूंना ट्रोल केले जाते. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) पाकिस्तानचा पराभव करावा अशी आमची इच्छा आहे. (हे ही वाचा:- IND vs PAK: रोहित शर्माने सराव करताना या गोलंदाजाला सांगितले खूप धोकादायक, आयसीसीने व्हिडीओ केला शेअर)
उद्या T20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) भारताचा पहिला सामना आहे. त्यातही भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) म्हणजे फुल हाय व्होल्टेज मॅच. मॅचच्या आठवड्याभरापूर्वीचं मौका मौकाच्या चर्चा क्रिकेट विश्वात रंगल्या आहेत. तरी उद्याची भारत विरुध्द पाकिस्तान या मॅचची उत्सुकता शिगेला पेटली असताना एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.