Lok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी
असदुद्दीन औवेसी यांनी नमो अॅपवरुन (NaMo App) विक्री होणाऱ्या टी-शर्टवरुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला असून त्यात नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि एआयएमआयएम (AIMIM)अध्यक्ष असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) सहभागी आहेत. तर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षातील नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहे. तसेच असदुद्दीन औवेसी यांनी नमो अॅपवरुन (NaMo App) विक्री होणाऱ्या टी-शर्टवरुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
असदुद्दीन औवेसी यांनी असे म्हटले आहे की, जीएसटीमुळे आधीच उद्योजक त्रस्त असून नमो अॅपवर टी-शर्ट विक्री केली जात आहे. त्यामुळे वाह! काय चौकीदार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जेट एअरवेज डबघाईला गेली असून चौकीदार एसबीआयचे 1500 करोड रुपये त्यांना देत आहेत. मेक इन इंडियाच्या नावावर हजारो फॅक्टरी बंद पडल्या आहेत. परंतु तुम्ही छोट्या उद्योगधंद्यांना कर्ज देऊ शकत नाही अशी टीका औवेसी यांनी केली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: टोपी आणि शिटी आणून दिल्यानंतर देशाची चौकीदारी करा, अकबरुद्दीन औवेसी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल)
ANI ट्वीट:
नरेंद्र मोदी यांचे सरकार एका बाजूनला एनसीआरओचा हवाला देऊन असे म्हणते की, बालकोट येथे वायुसेनेने केलेल्या हल्ल्यापूर्वी 300 मोबाईल अॅक्टिव्हेट होते. परंतु मोदी सरकार हे सांगू शकली नाही की, हल्ल्यापूर्वी 240 किलो आरडीएक्स कशा पद्धतीने तेथे पोहचले. त्याचसोबत देशातील शेतकऱ्यांचे हाल न पाहण्यासारखे झाले आहेत. तरीही मोदी सरकार आपल्याला कशा पद्धतीने यश मिळेल याकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचे सुद्धा औवेसी यांनी म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)