IPL Auction 2025 Live

Rajashtan येथे काँग्रेसच्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या हातात पाकिस्तानी झेंडा?

काँग्रेस पक्षाचा विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणूकीत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Congress Rally in Rajasthan (Photo Credit- Twitter)

नुकताच 11 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला. या निकालामध्ये मोदी सरकारला हरवत काँग्रेसने या निवडणूकीत बाजी मारली आहे. तसेच राजस्थानमध्ये ही काँग्रेसने आपला विजय मिळवला आहे. परंतु काँग्रेस पक्षाचा विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणूकीत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला 99 जागांवर विजय मिळवता आला. त्यावेळी राजस्थानमधील कार्यकर्त्यांमध्ये या विजयाची लाट ओसंडून वाहताना दिसली. मात्र या अतिउत्साहात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या पॉलिटिक्स सॉलिटिक्स नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर या रॅलीतील हिंदूकडे पाहून लाज वाटत असल्याची ही टीका करण्यात आली आहे.

रॅलीमधील हिरव्या झेंड्याचे सत्य काय आहे?

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसून आलेला झेंडा हा पाकिस्तानचा नाही. तसेच मुस्लिम बांधव हे आपले वर्चस्व दाखविण्यासाठी हिरव्या झेंड्याचा वापर करतात. त्यामुळे हिरव्या रंगाचा झेंडा हा पाकिस्तानचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.