IT Integration: पंजाब नॅशनल बँक ठरली देशातील दुसरी मोठी बँक; यूनाइटेड बॅंक ऑफ इंडिया, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्ससोबत एकत्रीकरण केले पूर्ण

सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank Of India) आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सच्या (Oriental Bamk Of Commerce) सर्व शाखांचे आयटी एकत्रीकरण (IT Integration) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

Punjab National Bank (Photo Credits: PTI | Representational Image)

सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank Of India) आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सच्या (Oriental Bamk Of Commerce) सर्व शाखांचे आयटी एकत्रीकरण (IT Integration) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामुळे पंजाब नॅशनल बॅंक भारतातील सर्वात मोठी बॅंक ठरली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने नोव्हेंबर महिन्यात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या सर्व शाखांचे आयटी एकत्रिकरण पूर्ण केले. त्यानंतर आज बॅंक ऑफ इंडियाच्या सर्व शांखांचे आयटी एकत्रिकरण पूर्ण केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, पीएनबीने युनायटेड बॅंक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बॅंक ऑफ इंडिया बॅंकेच्या डेटाबसचे एकत्रिकरण केल्याने या तिन्ही बॅंकेच्या ग्राहकांना समान व्यासपीठ मिळणार आहे. तसेच ग्राहक संपूर्ण बँक नेटवर्कवर अखंडपणे व्यवहार करण्यास तसेच पीएनबीचे डिजिटल बँकिंगचा वापर करण्यास सक्षम असणार आहे. ग्राहकांचे खाते क्रमांक, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग क्रेडेन्शियल्समध्ये व्यवस्थित बदल झाल्यावर संपूर्ण स्थलांतर पूर्ण झाले आहे. हे देखील वाचा- Bank Holidays in January 2021: जानेवारी महिन्यात 16 दिवस राहणार बँकांना सुट्टी; 'या' आहेत सुट्ट्यांच्या तारखा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑगस्ट 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे एकत्रीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या वर्षी 1 एप्रिल 2020 रोजी पंजाब नॅशनल बँकेत युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या 2 बँकांचे विलनीकरण करण्यात आले आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँक ही भारतीय स्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी बँक ठरली आहे.



संबंधित बातम्या