मला 5 मिनिटं उभं राहून सन्मान देण्यापेक्षा एखाद्या गरजू कुटुंबांची मदत करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन
माझ्या असं लक्षात आलं आहे की, काही लोकांना 5 मिनिटं उभं राहून माझा सन्मान करायचा आहे. परंतु, मला हे एक प्रकारचं शडयंत्र वाटतं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माझा सन्मान करायची एवढीचं इच्छा असेल तर कोरोनाच्या या संकटकाळात एखाद्या गरजू कुटुंबाची जबाबदारी घ्या, असंही मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना यासंदर्भात आवाहन केलं आहे.
मला 5 मिनिटं उभं राहून सन्मान देण्यापेक्षा एखाद्या गरजू कुटुंबांची मदत करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना केलं आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की, काही लोकांना 5 मिनिटं उभं राहून माझा सन्मान करायचा आहे. परंतु, मला हे एक प्रकारचं शडयंत्र वाटतं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माझा सन्मान करायची एवढीचं इच्छा असेल तर कोरोनाच्या या संकटकाळात एखाद्या गरजू कुटुंबाची जबाबदारी घ्या, असंही मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना यासंदर्भात आवाहन केलं आहे.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील लॉकडाऊन वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांचा सहभाग होता. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत पीएम नरेंद्र मोदी यांचे संकेत; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय)
दरम्यान, देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात 773 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 5194 वर पोहोचली आहे. त्यातील 401 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 150 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.