Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 'मन की बात', 'या' मुद्द्यांवर करू शकतात चर्चा
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम केला जातो. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व नेटवर्क आणि मोबाईल अॅप्सवर तो प्रसारित केला जातो.
Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रविवारी सकाळी 11.30 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या 85 व्या भागात संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार गांधीजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान देश-विदेशातील जनतेशी आपले मनोगत व्यक्त करतील. यासोबतच पंतप्रधानांनी लोकांना @mygovindia किंवा नमो अॅपवर त्यांच्या आठवणी शेअर करण्याची विनंती केली होती. मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 85 वा भाग असेल.
यावर्षी या कार्यक्रमाचा पहिला भाग आज प्रसारित होणार आहे. देशभरातील लोकांना हा कार्यक्रम आरामात ऐकता यावे यासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी 26 डिसेंबरला मन की बातचा शेवटचा एपिसोड केला होता ज्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरससह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. (वाचा - Jammu Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवादी ठार)
यासाठी लोकांना त्यांच्या सूचना NaMo अॅप किंवा MyJioVOpen फोरमवर शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मन की बात कार्यक्रमात, टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वर डायल करून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पंतप्रधानांसाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या. याशिवाय तुमच्या सूचना थेट 1922 वर मिस्ड कॉल देऊन किंवा मिळालेल्या लिंकवर जाऊन मेसेज पाठवाव्यात, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम केला जातो. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व नेटवर्क आणि मोबाईल अॅप्सवर तो प्रसारित केले जातो. तत्पूर्वी पंतप्रधानांनी देशातील लोकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता.
आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, पंतप्रधान महात्मा गांधींच्या जीवनातील प्रेरणादायी कथांसह मन की बात करणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय जागतिक स्तरावर भारतासाठी बदलणाऱ्या परिमाणांवरही पंतप्रधान प्रकाश टाकू शकतात.