IPL Auction 2025 Live

भारताकडे राफेल विमाने असती तर मोठी कामगिरी केली असती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताकडे जर राफेल (Rafel) विमाने असती तर देशाने मोठी कामगिरी केली असल्याचा अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi | Image Courtesy: PTI

भारताकडे जर राफेल (Rafel) विमाने असती तर देशाने मोठी कामगिरी केली असल्याचा अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यावेळी मोदी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. भारत- पाकिस्तान मधील तणावाच्या स्थितीत राफेल विमान खरेदी बाबत मोदी यांनी म्हटले आहे.

शनिवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती.तसेच राफेल करारावरुन विरोधकांकडून प्रत्येक वेळी टीका केली जात होती. तसेच राफेलमुळे सुरु असलेल्या स्वार्थी राजकरणापायी देशाचे मोठे नुकसान झाले असून राफेलची कमरता भासत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा- विंग कमांडर अभिनंदन ह्याच्या शौर्यामुळे नावाचा अर्थच बदलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Natrndra Modi) यांनी शनिवारी दिल्ली (delhi) विज्ञान भवनात आयोजन केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान भारत जे काही करतो ते सर्वजण जवळून पाहत असतात. भारताची ताकद अशी आहे जे शब्दकोशातील शब्दांचे अर्थ बदलून टाकतो. यापूर्वी अभिनंदन (Abhinandan) या शब्दाचा अर्थ 'Congratulations' असा होता. मात्र अभिनंदन या शब्दाचा अर्थच आता बदलणार असल्याची ताकद भारताकडे असल्याचे म्हटले आहे.