International Yoga Day 2022: म्हैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला योग; म्हणाले, 'योग जीवनाचा भाग नसून जगण्याची पद्धत आहे'

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, म्हैसूरसारख्या भारतातील आध्यात्मिक केंद्रांनी शतकानुशतके जो योग-ऊर्जा जोपासली आहे, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे.

PM Modi leads mass Yoga event at the Mysore (PC - ANI)

International Yoga Day 2022: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कर्नाटकात (Karnataka) असून त्यांनी म्हैसूर (Mysore) मधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेला संबोधित केले. 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लोकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पीएम मोदींनी योगाचे महत्त्व सांगितले. योगामुळे जगात शांतता नांदते. योग जीवनाचा भाग नसून जगण्याची पद्धत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, म्हैसूरसारख्या भारतातील आध्यात्मिक केंद्रांनी शतकानुशतके जो योग-ऊर्जा जोपासली आहे, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याला दिशा देत आहे. आज योग हा जागतिक सहकार्याचा परस्पर आधार बनत आहे. आज योगामुळे मानवाला निरोगी जीवनाचा विश्वास मिळत आहे. (हेही वाचा - Happy Yoga Day 2022 HD Images: आंतरराष्ट्रीय योग दिन HD Images, Wallpapers, Wishes शेअर करत द्या योगाप्रेमींना शुभेच्छा)

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम #YogaForHumanity आहे. या थीमद्वारे योगाचा संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी संयुक्त राष्ट्र आणि सर्व देशांचे मनःपूर्वक आभार मानतो. योगाचे महत्त्व सांगताना पीएम मोदी म्हणाले की, योगामुळे आपल्याला शांती मिळते. योगामुळे आपल्या राष्ट्रांना आणि जगाला शांती मिळते. योगामुळे आपल्या विश्वाला शांती मिळते. "Guardian Ring of Yoga" चा असा अभिनव वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात केला जात असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

शाश्वत भविष्याच्या दिशेने योगाचा हा शाश्वत प्रवास असाच सुरू राहील. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामया या भावनेने योगाद्वारे आम्ही निरोगी आणि शांत जगाला गती देऊ, असेही मोदी यावेळी म्हणाले.