पेट्रोलच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घट; पाहा आजचा भाव
दिल्ली आणि कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमतीत पुन्हा सात पैसे, मुंबईत सहा पैसे आणि चेन्नईमध्ये आठ पैसे प्रतिलिटर घट झाली आहे.
पेट्रोलच्या (Petrol) दरात रविवारी सलग तिसर्या दिवशी घसरण झाली, तर डिझेलच्या (Diesel) दरात सलग दुसर्या दिवशीही कोणताही बदल झाला नाही. दिल्ली आणि कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमतीत पुन्हा सात पैसे, मुंबईत सहा पैसे आणि चेन्नईमध्ये आठ पैसे प्रतिलिटर घट झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 72.74 रुपये, 75.45 रुपये, 78.42 रुपये आणि .75.59 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर अनुक्रमे 65.80 रुपये, 68.19 रुपये, 68.99 रुपये आणि 69.52 रुपये प्रतिलिटर कायम आहेत.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात, बेंचमार्क क्रूड तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल दोन डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आणि हीच वाढ कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 2 रुपयांची घट झाली आहे. 2 ऑक्टोबर 2019 रोजी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 74.61 रुपये, 77.23 रुपये, 80.21 रुपये आणि 77.50 रुपये होते. हे देखील वाचा- खुशखबर : SBI देत आहे 5 लिटर पेट्रोल मोफत प्राप्त करण्याची संधी