Today Petrol-Diesel Rate: महिन्याच्या शेवटच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
मुंबईत (Mumbai) पेट्रोल अजूनही 107.52 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लीटर आहे.
आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. सलग 7 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-diesel price) कोणताही बदल झालेला नाही. 24 ऑगस्ट रोजी 15 पैशांची कपात केल्यानंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 17 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत 35 दिवस पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. 22 ऑगस्ट रोजी भाव 20 पैशांनी कमी झाले. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलचे दर फक्त 35 पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेल 95 पैशांनी स्वस्त झाले आहे. आजही दिल्लीत (Delhi) पेट्रोलचा दर 101.49 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 88.92 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत (Mumbai) पेट्रोल अजूनही 107.52 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 101.82 रुपयांनी विकले जात आहे, तर डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर आहे.
भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणमुक्त आहेत. म्हणजेच सरकार त्यांचे नियमन करत नाही. परंतु जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीवर किंमती अवलंबून असतात. जेव्हा ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात 4 महिन्यांच्या निचांकावर घसरला. तेव्हा क्रूड 66 डॉलर प्रति बॅरलवर गेले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही मोठी कपात झालेली नाही. आता ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा 73 डॉलरवर आले आहे. अशा स्थितीत आता किंमतींमधून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही.