Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने सामान्यांच्या खिशाला चाप, पाहा आजचे नवे दर

या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे.

Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) च्या किंमती पुन्हा एखदा वाढवल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे. तेल कंपन्या या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करते. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), चेन्नई (Chennai) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किती वाढ झाली? घ्या जाणून

इंडियन ऑईल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 86.65 रुपये प्रति लीटर होता. तर मुंबईमध्ये तो 93.20 रुपये लीटर होता. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर रेट 88.01 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये 89.13 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आज 30 पैसे ते 40 पैश्यांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी मंगळवारी (3 फेब्रुवारी) इंधनाच्या दरांमध्ये 20 ते 25 पैशांनी वाढ केली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पुन्हा एकदा भाव वाढवण्यात आले आहेत. हे देखील वाचा- Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; कस्टम ड्यूटी घटल्यानंतर सोन्याच्या दरात झाली 'एवढी' मोठी घसरण

पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर-

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 93.20 83.67
दिल्ली 86.65 76.83
चेन्नई 89.13 82.04
कोलकाता 88.01 80.41

दरम्यान, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची आजची किंमत जाणून घेण्यासाठी BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमरला HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवता येतो.