IPL Auction 2025 Live

Petrol Diesel Price Today: चार दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा झाले स्वस्त; जाणून घ्या प्रमुख शहरांमधील तेलाचे दर

बुधवारी सुमारे 24 दिवसानंतर तेल कंपन्यांनी हा दर कमी केला होता.

Petrol/ Diesel Car(Photo Credits: PTI)

Petrol Diesel Price Today: चार दिवसानंतर आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली दिसून आली. मंगळवारी दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी घसरून 90.56 रुपयांवर गेले. तर डिझेलचा दर 23 पैशांनी कमी होऊन 80.87 रुपये प्रति लिटरवर आला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या बाजारामध्येही थोडा नरमपणा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 64.79 डॉलरवर आहे. गेल्या 15 दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमती 15 टक्क्यांहून कमी झाल्या आहेत.

यापूर्वी तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. बुधवारी सुमारे 24 दिवसानंतर तेल कंपन्यांनी हा दर कमी केला होता. या दोन दिवसांत दिल्लीत पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले.

असं असलं तरी जवळजवळ संपूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती विक्रमी उच्चांकांवर आहेत. यामुळे पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले की, जीएसटी परिषदेत यावर चर्चा होणार आहे. (वाचा - Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव)

प्रमुख शहरांचे दर -

दिल्लीमध्ये पेट्रोल 90.56 रुपये आणि डिझेल 80.87 रुपये प्रतिलिटरवर आले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल 96.98 रुपये आणि डिझेल 87.96 रुपये, चेन्नईत पेट्रोल 92.58 रुपये आणि डिझेल 85.88 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 90.77 रुपये आणि डिझेल 83.75 रुपये झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रमी किंमतींचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्यावरील मोठी कर आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईड ड्युटीतून 3.49 लाख कोटी रुपये मिळतील. कोरोना कालावधी असूनही सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील करामुळे यंदा प्रचंड महसूल मिळणार आहे.