Dogs Attack Girl In Chennai Park: पार्कमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलीवर पाळीव कुत्र्यांचा हल्ला, मालकाला अटक

सुदक्षा असे या पाच वर्षीय मुलीचे नाव असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Rottweiler Dogs Attack Girl In Chennai Park: चेन्नई (Chennai) तील एका उद्यानात रविवारी रात्री दोन रॉटवेलर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून कुत्र्यांच्या मालकाला अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणी कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चेन्नईच्या थाउजंड लाइट्स परिसरातील सार्वजनिक उद्यानात घडली.

प्राप्त माहितीनुसार, मालकाने कुत्र्यांना मोकळे सोडले होते. कुत्र्यांनी मुलीवर हल्ला केला त्यावेळी मुलीचे पालक तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, तरीही मालकाने हस्तक्षेप केला नाही. मुलीचे वडील उद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. (हेही वाचा -Delhi Dog Attack Video: दिल्लीत विश्वास नगरमध्ये पाळीव कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला, भयावह व्हिडिओ समोर)

वरिष्ठ पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी सांगितले की, आम्ही मालकाला अटक केली आहे आणि कुत्र्यांचे पालनपोषण करणाऱ्या दोन लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. सुदक्षा असे या पाच वर्षीय मुलीचे नाव असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Uttar Pradesh Dog Attack: उत्तर प्रदेशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू)

कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ -

अलीकडेच उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आईसोबत दुकानात गेलेल्या मुलीवर जर्मन शेफर्ड कुत्र्याने हल्ला केला होता. पीडित मुलगी चार वर्षांची होती. ही घटना पटेल नगर कोतवाली परिसरात घडली. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नोएडामध्ये सेक्टर-70 येथील पॅन ओएसिस सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एका भटक्या कुत्र्याने सहा वर्षांच्या मुलाला चावा घेतला. तसेच गेल्या वर्षी, अलिगड मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) कॅम्पसमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif