Female Doctor Attacked in Andhra Pradesh: देशात डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; आंध्र प्रदेशमध्ये रुग्णाचा महिला डॉक्टवर हल्ला

आंध्र प्रदेशमध्ये एका रुग्णालयात ऑन ड्युटी महिला डॉक्टरवर रुग्णाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात रुग्णाने डॉक्टरचे केस ओढून तिला बेडच्या लोखंडी कडांवर आपटले. सुदैवाने त्यावेळी सहकारी डॉक्टर धावून आल्याने कोणताही मोठी दुर्घटना घडली नाही.

Photo Credit- X

Female Doctor Attacked in Andhra Pradesh: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेनंतर काही आठवड्यांतच मात्र, त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. तिरुपती येथील रुग्णालयात महिला ज्युनियर डॉक्टरवर रुग्णाने हल्ला केल्याचा हा प्रकर घडला. श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SVIMS) येथे ही घटना घडली. या घटनेचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (हेही वाचा: 'सुरक्षेच्या नावाखाली, बसमध्ये पुढच्या रांगेत मुलींना बसू देत नाही'; शार्क टँक जज Vinita Singh यांची मुलाच्या शाळेतील नियमांवर आगपाखड)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर हॉस्पीटलमध्ये डॉक्टरचा पाठलाग करताना दिसला. तिला केसांनी पकडून बेडच्या स्टीलच्या कडांवर डोके आदळले. घटना लक्षात येताच वॉर्डातील इतर डॉक्टरांनी हस्तक्षेप करत रुग्णाला मागे ढकलले आणि ताबडतोब डॉक्टरच्या मदतीला आले. त्यानंतर हल्लेखोराने तेथून पळ काढला.(हेही वाचा: Kolkata Rape Murder Case: 'रेड लाईट एरियात गेला, प्रेयसीकडून मागितले न्यूड फोटो', आरोपी संजय रॉयने CBIला सांगितले गुन्ह्याच्या रात्री काय केले?)

एसव्हीआयएमएसचे संचालक आणि कुलगुरू डॉ आरव्ही कुमार यांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टने नमूद केले की, 'ती शनिवारी आपत्कालीन औषध विभागात कर्तव्यावर असताना तिच्यावर एका रुग्णाने अनपेक्षितपणे हल्ला केला, बंगारू राजू असे त्याचे नाव. त्याने मागून माझ्याजवळ हल्ला केला. त्याने माझे केस ओढले आणि बेडच्या स्टीलच्या रॉडवर जबरदस्तीने माझे डोके आपटले. त्यावेळी तेथे कोणतेही सुरक्षा कर्मचारी तिला मदत करण्यासाठी उपस्थित नव्हते.'

केस ओढले, बेडच्या स्टीलच्या रॉडवर डोकं आपटलं

डॉक्टने पुढे असेही सांगितले की, 'या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जर रुग्णाकडे धारदार शस्त्र असते, तर परिस्थिती गंभीर परिणामांसह वाढू शकली असती,' कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा उपायांची मागणी डॉक्टरने केली आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केले. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, तिरुपती येथील SVIMS येथील घटनेने ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now