Employment News: केंद्र सरकारच्या 78 विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक रिक्त पदे; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
रोजगार मेळा (Rozgar Mela) कार्यक्रम हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी उपक्रम म्हणून सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत 10 लाख तरुणांना लाभदायक सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात उत्प्रेरक म्हणून काम करेल, असेही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं.
Employment News: केंद्र सरकारच्या 78 मंत्रालये आणि विभागांमध्ये 9.79 लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती सरकारने गुरुवारी दिली. यापैकी रेल्वेमध्ये 2.93 लाख, संरक्षण (नागरी) 2.64 लाख आणि गृह मंत्रालयात 1.43 लाख पदे रिक्त आहेत. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी भाजपचे सदस्य सुशील कुमार मोदी (BJP MP Sushil Modi) यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
रोजगार मेळा (Rozgar Mela) कार्यक्रम हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी उपक्रम म्हणून सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत 10 लाख तरुणांना लाभदायक सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात उत्प्रेरक म्हणून काम करेल, असेही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - HPCL Recruitment 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नोकरीची संधी, पगार 7,52,000 रुपये, पण पात्रता आणि अटी काय? घ्या जाणून)
सिंग म्हणाले की, 'जॉब फेअर' कार्यक्रम देशभरात आयोजित केले जात आहेत आणि विविध केंद्रीय मंत्रालये, विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि स्वायत्त संस्थांमध्ये तरुणांना स्थान दिले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रीय भर्ती एजन्सी स्थापन करण्यात आली आहे आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी केंद्र तसेच राज्यांमधील भरती प्रणालींचा तपशीलवार अभ्यास केला आहे.