Encounter At Pattan: बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टन येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

सध्या या भागात संयुक्त ऑपरेशन प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराने माहिती दिली आहे.

One terrorist eliminated in an ongoing encounter at Pattan (PC - ANI)

Encounter At Pattan: बारामुल्ला जिल्ह्यातील (Baramulla District) पट्टन (Pattan) येथे सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. सध्या या भागात संयुक्त ऑपरेशन (Joint Operation) प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराने (Indian Army) माहिती दिली आहे.

दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला. जखमी अधिकाऱ्याला आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या सुरक्षा दलाने अतिरेक्यांना घेराव घातला असून या भागात गोळीबार सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या बारामूल्ला मधील येडीपोरा पट्टन भागात पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले. (हेही वाचा - Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर मधील बारामूला येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु)

या भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी या परिसराला वेढा घातला होता. त्यानंतर काही वेळातचं दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. यास सुरक्षा सुरक्षा दलाने चौख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं.