Jammu Kashmir Oath Ceremony: ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबरला घेणार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ओमर अब्दुल्ला नवे मुख्यमंत्री होणार आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून वेळ दिली आहे.

Omar Abdullah (फोटो सौजन्य - एक्स)

Jammu Kashmir Oath Ceremony: नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष (National Conference Vice President) ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections of Jammu and Kashmir) दणदणीत विजय मिळवल्यानंतर ओमर अब्दुल्ला नवे मुख्यमंत्री होणार आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Jammu and Kashmir Lieutenant Governor Manoj Sinha) यांनी ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून वेळ दिली आहे.

पत्रात त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11:30 वाजता SKICS श्रीनगर येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मला एलजी जम्मू आणि काश्मीरच्या कार्यालयाकडून पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणारे पत्र मिळाले आहे. त्यासाठी 16 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मी 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, असं ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे. (हेही वाचा -J&K's First CM After Article 370 Abrogation: जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर Omar Abdullah पहिले मुख्यमंत्री; Budgam आणि Ganderbal मधून दोन्ही मतदारसंघातून विजयी)

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने यावेळी आश्चर्यकारक कामगिरी केली. या निवडणुकीत एनसीला स्वबळावर 42 जागा मिळाल्या आहेत. राज्यात काँग्रेसला केवळ 6 जागा जिंकण्यात यश आले. तथापी, नॅशनल कॉन्फरन्स 90 पैकी 42 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला असून राज्यपालांनी 16 ऑक्टोबरला सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला निवेदन दिले आहे. (हेही वाचा -Omar Abdullah On Article 370 Verdict: कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उमर अब्दुल्ला यांचे ट्विट, लिहिले- 'निराश, पण हरलो नाही')

जम्मू-काश्मीरमधील सर्व 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांहून अधिक होती. गेल्या दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठी हार पत्कारावी लावली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now