Uttarakhand Accident: अधिकाऱ्याच्या कारने तीन जणांना चिरडले, भयावह घटना CCVT कैद
अधिकाऱ्याच्या कारने तीन जणांना उडवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Uttarakhand Accident: उत्तराखंडातील बौराडी जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. अधिकाऱ्याच्या कारने तीन जणांना उडवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- वधू-वरांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, बस जळून खाक, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, बौराडी जिल्ह्यातील या अपघातानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर एक महिला आणि दोन मुली जात होते. त्याच वेळीस विरुध्द दिशेने भरधाव कार आली आणि रस्त्याच्या कडेला जात असल्यांना तिघींना उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, तिघे जण दुर पर्यंत उडाले. कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. कार देवी प्रसाद चमोली चालवत होते. ते खंड विकास अधिकारी आहे. पोलिसांनी देवी प्रसाद यांना अटक केले आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, तीघे जण हवेत उडल्या. धडकेत महिलाचा जागीच मृत्यू झाला आणि मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. अपघातात रीना नेगी (36) आणि तिच्या दोन भाची अग्रिमा (10) आणि अन्विता (7) यांचा मृत्यू झाला. महिला आपल्या भाचींना फिरायला घेऊन जात होती त्यावेळीस ही घटना घडली.