Uttar Pradesh: नर्सिंगच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या, उत्तर प्रदेश येथील घटना

हॉस्पिटलमधील वसतिगृहाच्या एका खोलीत 23 वर्षीय विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.

Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामकृष्ण मिशन सेवाश्रम चॅरिटेबल हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमधील वसतिगृहाच्या एका खोलीत 23 वर्षीय विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आस्कमित मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. वार्डनच्या अत्याचारामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थिनीचे रश्मी नाव असून ती मूळची आग्राची आहे. ती गेल्या दोन वर्षांपूर्वी या वसतिगृहात दाखल झाली होती. दरम्यान, बुधवारी रश्मी दरवाजा उघडत नसल्याने तिच्या क्लासमेटने खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी रश्मी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसली. त्यानंतर संबंधित तरूणीने त्वरीत वॉर्डन आणि इतर कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. या घटनेचृी माहिती होताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनतर संपूर्ण वसतिगृहात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- BJP National Executive Committee: भाजपने जाहीर केली राष्ट्रीय कार्यकारिणी; Narayan Rane यांना वगळले, जाणून घ्या महाराष्ट्रातून कोणत्या नेत्यांचा झाला समावेश

मृत विद्यार्थी जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा करीत होती. ती अतिशय हुशार आणि चांगली वर्तणूक असलेली विद्यार्थी होती. पण गेल्या काही महिन्यांपासून ती नैराश्यात होती, असे सहाय्यक सचिव आणि रुग्णालय प्रशासक स्वामी कालीकृष्णानंद यांनी म्हटले आहे.