Kanpur Crime: कानपूरमध्ये नर्सची हत्या, दोन महिन्यांनंतर आरोपी हेड कॉन्स्टेबलला अटक
फेब्रुवारी महिन्यात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपी शोध घेतला.
Kanpur Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलने नर्सची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपी शोध घेतला. उत्तर प्रदेशात या घटनेनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या मित्र यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि मृत महिला गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- ठाण्यात क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याचा दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; पिता-पुत्राला पोलिसांकडून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात खासगी रुग्णालयातील नर्सचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी शोध सुरु ठेवला. शालिनी तिवारी असं मृत तरुणीचे नाव होते. हेड कॉन्स्टेबल मनोज कुमार (50) आणि राहुल कुमार असं दोन आरोपींची नावे समोर आली आहे. शालिनीच्या मित्राचा अपघात झाला होता त्यावेळीस ती मनोज कुमार यांना भेटली. त्यांच्या सुरवातीला चांगली मैत्री जमली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे अफेयर सुरु होते. शालिनी मनोजला लग्नासाठी दबाब टाकत होती. मनोज यांचे लग्न झाले होते. हे शालिनीला माहिती होते तरी ती मनोजला लग्नासाठी दबाव टाकत होती.
मनोजने या गोष्टीला कंटाळून शालिनीची हत्या केली असे समोर आले आहे. शालिनीला भेटून त्याने तीचा गळा दाबून हत्या केली. एटा येथील परिसरात तीचा मृतदेह फेकला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या हत्या प्रकरणात मनोजचा मित्र देखील सामिल होता. पोलिसांनी शालिनीच्या सिम कार्डचा रिपोर्ट मागवला होता. त्यानंतर रिपोर्टमध्ये मनोज यांचा नंबर सापडल्याने ही घटना उघडकीस आली.