आता 130 रुपयांत पहा आपल्या आवडीच्या 100 वाहिन्या; TRAI चा नवा नियम

ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही 130 रुपयांत तुमच्या आवडीच्या 100 वाहिन्या पाहू शकता

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

ट्राय (TRAI) ने आपल्या ग्राहकांना मेसेजस पाठवून नव्या नियमांविषयी सूचना देण्यास सुरुवात केली आहे. हा नियम DTH आणि केबल ऑपरेटर यांनाही लागू आहे. आता ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही 130 (जीएसटीसह 153.40 पैसे) रुपयांत तुमच्या आवडीच्या 100 वाहिन्या पाहू शकता. केबल ऑपरेटर आणि ट्राय यांच्यामध्ये चाललेल्या शीतयुद्धामुळे ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत त्यांना हव्या असलेल्या वाहिन्या निवडण्यास सांगितले होते. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून त्या नवीन वाहिन्या दाखवण्यास सुरुवात होणार होती. मात्र ग्राहक आता 130 रुपयांच्या पॅकमध्ये 100 निःशुल्क किंवा शुल्क असलेल्या वाहिन्या पाहू शकतात.

याबाबत ग्राहकांनी आपआपल्या सेवा पुरवठादारांशी संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी. योग्य माहिती मिळत नसल्यास ग्राहक 011-23237922 (ए.के.भारद्वाज), 011-23220209 (अरविंद कुमार) या क्रमांकांवर फोन करु शकतात, किंवा advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in या इमेल आयडीवर मेल करुन माहिती जाणून घेऊ शकतात. (हेही वाचा : टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)

ट्रायने वाहिन्यांचे दर हे जास्तीत जास्त 19 रुपये असावेत असे सांगितले आहे. त्यानुसार 130 रुपयांचे बेस पॅक आणि त्यानंतर हव्या असलेल्या वाहिन्यांसाठी त्या त्या वाहिन्यांप्रमाणे दर आकारले जाणार आहे. यासाठी कलर्स, झी, सोनी, स्टार अशा वाहिन्यांचे एकत्रित पॅकही उपलब्ध आहेत.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल

Pahalgam Terror Attack: 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सैन्याच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नये'; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Advisory For Social Media And OTT Channels: केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी चॅनेलसाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे; अश्लील कंटेंटवर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement