सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही -सर्वोच्च न्यायालय

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सहमतीने ठेवल्या जाणाऱ्या शरीरसंबधांना बलात्कार म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले. एखाद्या जोडप्याचे लग्न होणार नसल्याची खात्री असूनही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबध ठेवल्यास तो बलात्कार ठरत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. एखाद्या व्यक्तीने लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केले, असेही म्हणता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

लग्नाचे आमिष दाखवून बलत्कार केल्याच्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सहमतीने ठेवल्या जाणाऱ्या शरीरसंबधांना बलात्कार म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच एखाद्या जोडप्याचे लग्न होणार नसल्याची त्यांना खात्री असूनही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबध ठेवल्यास तो बलात्कार ठरत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. एखाद्या व्यक्तीने लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केले, असेही म्हणता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने २००८ साली सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनी केला होता. तक्रारदार महिला या आधिकाऱ्याला १९९८ सालापासून ओळखत आहे. दरम्यान, दोघेही ऐकमेकांच्या घरी थांबत होते. परंतु २०१४ मध्ये जातीचा अडसर आल्यामुळे या आधिकाऱ्याने लग्नास नकार दिला होता.

(हे देखील वाचा-मुंबई: अल्पवयीन मुलीचा पतीकडून लैंगिक छळ, भावाकडून बलात्कार तर आईनेच ढकलले वेश्याव्यवसायात; 5 जणांना अटक)

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या पिठासमोर सुनावणी पार पडली. या दोघांमध्ये ८ वर्षापासून प्रेम संबध होते. या अधिकाऱ्याने २००८ साली दिलेले वचन २०१६ मध्ये पूर्ण करु शकला नाही. या दरम्यान दोघही ऐकमेकांच्या सहमतीने शरीरसंबध ठेवत होते. लग्नात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात हे महिलेला माहीत होते. त्यामुळे या शरीरसंबंधांना बलात्कार म्हणू शकत नाही, असा निकाल देत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.