पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ हिंदूच नव्हे तर हिंदूंचे देवही संकटात - सचिन सावंत

त्यामुळे अनेक कुटुंब उद्धस्त झाले आहेत. त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे. पीएनबी, पीएमसीनंतर आता 'येस' बँकेची वेळ आली आहे. या बँकेतील हिंदूंचे पैसे बु़डाले आहेत. तसेच पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे 545 कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे 'मोदींच्या राज्यात केवळ हिंदूच नव्हे तर हिंदूंचे देवही संकटात आहेत,' अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे.

Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

देशातील बँकांमध्ये असणारा पैसा हा बहुसंख्य हिंदूंचाच असून तो सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे अनेक कुटुंब उद्धस्त झाले आहेत. त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे. पीएनबी, पीएमसीनंतर आता 'येस' बँकेची वेळ आली आहे. या बँकेतील हिंदूंचे पैसे बु़डाले आहेत. तसेच पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे 545 कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे 'मोदींच्या राज्यात केवळ हिंदूच (Hindus) नव्हे तर हिंदूंचे देवही (Hindus Gods) संकटात आहेत,' अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. 'येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या आहेत.

पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यावेळीदेखील लोकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना बँकेबाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या. तसेच देशात आत्महत्या करणाऱ्या तरुणामध्ये आणि शेतकऱ्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. आता येस बँकेत पैसे अडकलेले ग्राहक हे हिंदूच आहेत. या बँकेतील संकटाने हिंदूंच्या देवालाही सोडले नाही, असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे. (हेही वाचा - Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा)

एक महिन्यापूर्वी पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिरातील 545 कोटी रुपये 'येस' बँकेत जमा करण्यात आले होते. भाजप नेते ‘हिंदू खतरें में,’ असे उर बडवून सांगितात. परंतु, खरचं मोदींच्या राज्यात ‘हिंदू खतरें में’, अशी स्थिती झाली आहे, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.