North India Rain Updates: उत्तर भारतात पावसाचा कहर; 19 जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

हिमाचलमधील 7 शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.

Delhi Rain (Image Credit - ANI Twitter)

देशातील 8 राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) थैमान पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, दिल्ली आणि पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून विविध ठिकाणी झालेलं भूस्खलन आणि दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत पावसाने 40 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. रविवारी सकाळी 8:30 वाजता संपलेल्या 24 तासांत दिल्लीत 153 मिमी पावसाची नोंद झाली, जो 1982 पासून जुलैमध्ये एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. (हेही वाचा - Gurugram Waterlogging: जोरदार पावसाने गुरुग्राम परिसरात रस्त्यावर पाणी; गाड्या चालवताना करावी लागते कसरत)

हिमाचल प्रदेशमध्ये देखील मुसळधार पावसामुळे पावसाने नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. हिमाचलमधील 7 शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. हिमाचलमध्ये मागील 36 तासांत भूस्खलनाच्या 14 घटना घडल्या असून 13 ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे सुमारे 700 रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, उत्तराखंड मधील ऋषीकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुले भाविकांची कार दरीत कोसळल्याने 3 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मनाली येथे पूरसदृश स्थितीमुळे काही दुकाने वाहून गेली आहेत, तर कुलूसह काही शहरांत आलेल्या पुरामुळे वाहने वाहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

दिल्लीत येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणऱ असल्याचा इशारा हा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.