Noida Shocker: एससी वकील रेणू सिन्हा यांची बंगला विक्रीवरून पतीने केली हत्या, संशय टाळण्यासाठी आरोपी 24 तास स्टोअर रूममध्ये लपला
अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादामुळे हत्या केली.
Noida Shocker: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल असणाऱ्या महिलेची पतीने हत्या केली. अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादामुळे हत्या केली. नोएडा येथील राहत्या बंगल्यात त्यांने ही हत्या केली. अजय नाथ या 62 वर्षीय माजी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी यांना त्यांची पत्नी, सर्वोच्च न्यायालयातील वकील रेणू सिन्हा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सिन्हा यांच्या भावाने तिच्या गैरहजेरीची तक्रार स्थानिक पोलिसांकडे केली तेव्हा तिने दोन दिवस वारंवार केलेल्या फोन कॉलला प्रतिसाद न दिल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यावर कारवाई करत पोलिसांनी बळजबरीने बंगल्यात प्रवेश केला आणि बाथरूममध्ये सिन्हा यांचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता घोषित केलेल्या अजय नाथचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली असून नाथ बंगल्याच्या स्टोअर रूममध्ये 24 तास लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर नाथला अटक करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चौकशीनंतर नाथने संपत्तीच्या वादातून सर्वोच्च न्यायालयातील वकील पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. नाथ यांनी त्यांचा बंगला ४ कोटी रुपयांना विकण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी त्यांना आगाऊ रक्कमही मिळाली होती. मात्र, सिन्हा या विक्रीला कडाडून विरोध करत होते. दरम्यान, सिन्हा कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्या हत्या करण्याच्या फक्त एक महिना आधी, त्यांना कर्करोगमुक्त घोषित करण्यात आले होते.
सिन्हा यांचा मृत्यू जास्त प्रमाणात रक्तस्रावामुळे झाला असावा, परंतु त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टमनंतर स्पष्ट होईल. अधिकार्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, सध्या तपास सुरू आहे.