Noida Petrol Pump Fight Video: नोएडात गुंडगिरी, पेट्रोलपंपवर तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

नोएडातील एका पेट्रोल पंपावर तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Noida Petrol Pump Fight Video:

Noida Petrol Pump Fight Video: नोएडातील एका  पेट्रोल पंपावर तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही गुंडांमध्ये, एका तरुणाचा वाद झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाला जमिनीवर फेकून मारहाण केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणाला मारहाण केल्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. पेट्रोल पंपवर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये  ही घटना कैद झाली आहे. मात्र, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. किंवा नाही, याबाबत सध्या कोणतीही बातमी नाही.