Nitish Kumar To Take Oath As CM: भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार; रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ - रिपोर्ट
त्याच वेळी, या करारानुसार, भाजपला बिहारमध्ये 2 उपमुख्यमंत्री पदे मिळणार आहेत.
Nitish Kumar To Take Oath As CM: बिहार (Bihar) मधील राजकीय गोंधळादरम्यान, जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) भाजप (BJP) च्या पाठिंब्याने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या पक्ष आरजेडीसोबतच्या वाढत्या तणावानंतर नितीश कुमार महागठबंधन तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतात. एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार 28 जानेवारी (रविवार) रोजी भाजपच्या पाठिंब्याने सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याच वेळी, या करारानुसार, भाजपला बिहारमध्ये 2 उपमुख्यमंत्री पदे मिळणार आहेत.
दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. सीएम नितीश कुमार राजभवनात पोहोचले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि मंत्री तेज प्रताप अद्याप आलेले नाहीत. याआधी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीतही दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. (हेही वाचा - Hyderabad: तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री Mahmood Ali प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान बेशुद्ध, Watch Video)
तथापी, गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी, सुशील मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह बिहारमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. ते कुमार यांना पुन्हा युतीत सामावून घेण्यास इच्छुक असल्याची अटकळ बांधली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक चार आमदारांमागे एका मंत्रिपदाचा समावेश असेल.
या घडामोडींदरम्यान शुक्रवारी जेडी (यू) आणि आरजेडी यांच्यातील वाढत्या मतभेदाचे संकेत देणारे महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात स्पष्ट अंतर दिसून आले. एका सरकारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी तेजस्वी यादव यांनी अंतर राखणे आणि मुख्यमंत्र्यांच्या शेजारील खुर्ची रिकामी ठेवली. तथापी, नितीश कुमार यांनी 28 जानेवारीचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. नितीश रविवारी जाहीर सभेलाही संबोधित करणार होते, मात्र, आता हा कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला आहे. यामुळे नितीश कुमार पुन्हा बाजू बदलणार असल्याच्या अटकळांना आणखी खतपाणी मिळत आहे.