Anant Ambani and Radhika Merchant यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका Kashi Vishwanath Temple मध्ये अर्पण
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पहिली पत्रिका महादेवाच्या चरणी अर्पण केली.
Anant Ambani and Radhika Merchant first wedding invite at Kashi Vishwanath Temple: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा, नीता अंबानी(Nita Ambani) यांनी काशी विश्वनाथ मंदिराला(Kashi Vishwanath Temple) भेट दिली, महादेवाचे आशीर्वाद घेतले. अनंत अंबानी(Anant Ambani) आणि राधिका मर्चंट(Radhika Merchant) यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका महादेवाच्या चरणी अर्पण केली. उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी यांचा बहुप्रतिक्षित विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. काशी विश्वनाथ मंदिराला भेट देताना नीता अंबानी सुंदर गुलाबी साडी नेसल्या होत्या. नीता अंबानी या गंगा आरतीला उपस्थित राहिल्या.
नीता अंबानी म्हणाल्या, 'महादेवाची प्रार्थना केली. खूप धन्य वाटत आहे. आज मी अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन इथे आले आहे. 10 वर्षांनी इथे आले आहे. इथला विकास पाहून मला आनंद वाटत आहे. गंगा आरतीच्या वेळी मी येथे आले हे माझे भाग्य आहे. खूप छान वाटते' अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळा 12 जुलै ते 14 जुलै असे 3 दिवस असणार आहे.12 जुलै ला मुख्य लग्न सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादासह हा उत्सव सुरू राहील आणि 14 जुलै दिवशी रिसेप्शन पार पडणार आहे. या सोहळ्याला देखील देशा- परदेशातील मान्यवर हजर राहण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, जामनगरमध्ये लग्नाआधीच्या उत्सवांची मालिका आयोजित केली होती, ज्यामध्ये जगभरातून उद्योगपती, हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. मान्यवर पाहुण्यांमध्ये मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग पत्नी प्रिसिला चॅन, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि इव्हांका ट्रम्प यांचा समावेश होता. क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासह गौतम अदानी, नंदन निलेकणी आणि अदार पूनावाला, अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर, रणबीर कपूर-आलिया भट्ट, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह बॉलीवूडमधील अभिजात मंडळींनी उत्सवाला ग्लॅमर जोडले होते.