केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 4 वाजता पत्रकारांशी साधणार संवाद; 20 लाख कोटी रुपयांचा कसा होणार वापर? याची देणार माहिती
नरेद्र मोदी यांनी 20 लाखा कोटींचे पॅकेज जाहिर केल्यानंतर त्याचा योग्य विनोयोग होईल, अशी अपेक्षा कॉंग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी संपूर्ण देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. नरेद्र मोदी यांनी 20 लाखा कोटींचे पॅकेज जाहिर केल्यानंतर त्याचा योग्य विनोयोग होईल, अशी अपेक्षा कॉंग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. तसेच काँग्रेसच्या काही नेत्यांनी पॅकेजचे विवरण आल्यावरच आपल्याला माहीत होईल की कुठल्या क्षेत्राला किती फायदा होईल, असेही म्हटले होते. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) कोणकोणत्या क्षेत्राला किती रक्कम दिली जाणार आहे, याबाबत माहिती देणार आहेत. सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेतून जनतेशी संवाद साधणार आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूचे जाळे हळूहळू संपूर्ण देशात पसरत चालले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी पश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर पूर्णविराम लावण्यासाठी अर्थमंत्री सितारामन आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच ही कोणत्या क्षेत्रासाठी किती रक्कम हे देखील सांगणार आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 74281; मागील 24 तासांत 3525 नव्या रुग्णांची भर
एएनआयचे ट्वीट-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे, असे नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सांगितले होते. “पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थमंत्री यांच्याकडून स्वावलंबी भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले आहे. सुधारणा राबवणे हे महत्वाचे आहे. सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलो आहोत. कोणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हे देखील त्यावेळेस झाले आहे ज्यावेळेस सगळे बंद होते. सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील,” असे नरेंद्र मोदी त्यावेळी म्हणाले होते.