J&K Terror Funding Case: NIA न्यायालयाचा आदेश, दहशतवादी हाफिज सईद आणि सय्यद सलाहुद्दीन यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
हाफिज सईद या घोषित आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भयानक आरोपीने दहशतवादी निधीसाठी भारतात पैसे पाठवले होते, असे न्यायालयाने नमूद केले.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (National Investigation Agency) न्यायालयाने आज शनिवारी लष्कर-ए-तैयबा (LeT) संस्थापक हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि हिजबुल मुजाहिद्दीन प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, यासिन मलिक, शब्बीर शाह, मसरत आलम यांच्यासह अनेक काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर Uapaच्या विविध कलमांखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. हाफिज हा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. एनआयए कोर्टाला असे आढळून आले की, दहशतवादी फंडिंगसाठीचा पैसा पाकिस्तान आणि त्याच्या एजन्सींनी पाठवला होता आणि राजनयिक मिशनचा वापर नापाक योजना पूर्ण करण्यासाठी केला गेला होता. हाफिज सईद या घोषित आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भयानक आरोपीने दहशतवादी निधीसाठी भारतात पैसे पाठवले होते, असे न्यायालयाने नमूद केले.
हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड
हाफिज सईद हा संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी आहे. अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची मुखवटा घातलेली संघटना आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी लष्कर जबाबदार आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 जणांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही त्याला डिसेंबर 2008 मध्ये दहशतवादी घोषित केले होते. (हे देखील वाचा: Jammu-Kashmir Update: श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान)
Tweet
हाफिज सईद हा देशाचा मोस्ट वॉन्टेड
भारत दीर्घकाळापासून सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करणारे अनेक दहशतवादी आहेत. यूएपीएच्या माध्यमातून सरकारने यापूर्वीच अनेक संस्था आणि व्यक्तींना दहशतवादी घोषित केले आहे. यासोबतच देशातील अनेक एजन्सी या घोषित संस्था आणि दहशतवाद्यांवर विशेष नजर ठेवतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)