IPL Auction 2025 Live

Pulwama Terror Attack: NIA ला मिळाले मोठे यश, दहशतवादी आदिल ला मदत करणाऱ्या शाकिर बशीर ला अटक

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शाकीर बशीर मगरे नावाचा हा दहशतवादी पुलवामा हल्ल्याचा आरोपी आहे. जैश-ए-मोहम्मदच्या भूमिगत दहशतवाद्याने त्याच्या घरात पुलवामा आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याला आश्रय दिला होता.

पुलवामा दहशतवादी हल्ला (Photo Credits: Instagram)

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) शुक्रवारी पुलवामा हल्ल्यात सहभागी आत्मघातकी दहशतवाद्याचा मुख्य साथीदार याला अटक केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शाकीर बशीर मगरे (Shakir Bashir Magrey) नावाचा हा दहशतवादी पुलवामा हल्ल्याचा आरोपी आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) च्या भूमिगत दहशतवाद्याने त्याच्या घरात पुलवामा आत्मघातकी हल्लेखोर (Pulwama Suicide Attacker) आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) याला आश्रय दिला होता. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या त्या हल्ल्यात त्यानेचा मालाचा पुरवठाही केला होता. ज्यानंतर या दोघांनी दहशतवादी हल्ला केला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 सैनिक शहीद झाले होते. (Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला)

एनआयएच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान शाकिर बशीरने खुलासा केला आहे की त्याने आदिल दार आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूकला आपल्या घरी आश्रय दिला होता. दोन्ही दहशतवाद्यांना आयईडी स्फोटकं तयार करण्यास मदतही केली होती." अटकेनंतर आता शाकीरला चौकशीसाठी 15 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान एनआयए दहशतवादी आदिल आणि मोहम्मद उमरसोबत हल्ल्याशी संबंधित महत्वाच्या गोष्टींची चौकशी करणार आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. गोरीपुरा गावाजवळ झालेल्या या हल्ल्यात 44 भारतीय सैनिक ठार झाले होते. आत्मघाती हल्लेखोरांनी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसलास्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. काश्मीरमधील 30 वर्षांचा पुलवामा हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी 350 किलो आयईडी वापर केल्याचे तपासात उघड झाले. याच्या प्रत्युत्तरात भारतानेहवाई मर्यादेचे उल्लंघन केले आणि पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता.