Zomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी

ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड आणि फूड ऑर्डरिंग फर्म झोमाटो (Zomato)ने ड्रोन स्टार्टअप कंपनी टेक इगल इनोव्हेशन्स विकत घेतली आहे.

झोमॅटो ड्रोन डिलिव्हरी (Photo Credit: Twitter/Pixabay)

ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड आणि फूड ऑर्डरिंग कंपनी झोमाटोने (Zomato) ड्रोन स्टार्टअप कंपनी टेक इगल इनोव्हेशन्स विकत घेतली आहे. लखनऊ स्थित टेकइगल इनोव्हेशन्स ही कंपनी ड्रोन निर्मितीवर काम करते. ड्रोनद्वारे ऑर्डर डिलिव्हरीसाठी याची नक्कीच मदत होईल. यामुळे हायब्रिड मल्टी-रोटर ड्रोनद्वारे हब-टू-हब वितरण नेटवर्क बनविण्यासाठी याचा फायदा होईल, असे झोमाटोने सांगितले आहे. टेक इगल (TechEagle) आणि झोमाटो यांच्यामध्ये हा करार किती रुपयांत झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

2015 मध्ये आयआयटी कानपूरमध्ये विद्यार्थीदशेत असताना विक्रम सिंग मीना यांनी टेक इगल या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून ते मानवविरहीत एरिअल व्हेहिकल्सच्या निर्मितीमध्ये गुंतले आहेत. मात्र 5 किलो वजन वाहण्याची क्षमता असलेल्या ड्रोनवर काम करणाऱ्यावर त्यांचा मुख्य कल आहे.

सध्या ड्रोनचे काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पण लवकरच भविष्यात ऑर्डर डिलिव्हर करणारे ड्रोन बनविले जातील. त्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहेत, असे झोमॅटोचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी सांगितले.

सध्या झोमॅटोचा पहिला डिलिव्हरी जॉब मल्टी रोटर ड्रोन डिझाईन करण्याचे काम सुरु असून तो 5 किलोपर्यंतचे वजन पेलू शकेल. दूरवर डिलिव्हरी देणारे ड्रोन्स हा भविष्यातील एक अपरिहार्य भाग असेल, असेही गोयल म्हणाले.

यावर्षी ऑगस्टमध्ये देशातील व्यावसायिक ड्रोन फ्लाइंगचे नियम सरकारने जाहीर केले आणि ते 1 डिसेंबर 2018 पासून लागू होतील, असेही सांगितले होते. मात्र हे नियम अद्याप अन्न वितरण आणि ई-कॉमर्ससाठी लागू होणार नाहीत.