Video: तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण, लक्ष्य विचलीत करणारे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल; उत्तर प्रदेश पोलिसांकडून आरोपीस अटक, घरावर बुलडोजर
व्हिडिओत एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण दिसतो आहे. व्हिडिओतील दृश्ये आपणास विचलीत करु शकतात. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील रीवा (Riva) येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओत एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण दिसतो आहे. व्हिडिओतील दृश्ये आपणास विचलीत करु शकतात. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही घटना शनिवारी (24 डिसेंबर 2022) घडली. व्हिडिओ रीवा (Riva Viral Video) जिल्ह्यातील मऊगंज (Mauganj) गावातील असल्याची प्रथमिक माहिती आहे.
व्हिडिओत पाहायला मिळते की, एक तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत बोलत आहेत. बोलता बोलता त्यांच्यात लग्नाचा विषय निघतो आणि तरुण बेभाण होतो. बेभान झालेल्या तरुणाचे स्वत:वरचे नियंत्रण इतके सुटते की तो तरुणीला बेदम मरहाण करण्यास सुरुवात करतो. पीडिता प्रचंड कळवते. पण तरुणाचे हृदय द्रावत नाही. तो तिला जमीनीवर आदळतो. तिच्या पायांवर पाठीवर, चेहऱ्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतो. ज्यामुळे तरुणी बेशुद्ध पडते. पीडिता बराच वेळ बेशुद्ध पडते. दरम्यान, परिसरातील नागरिक एकत्र आल्यावर तरुणाला फटकारत तरुणीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करतात. (हेही वाचा, Uttarakhand Rape Case: नात्याला काळीमा फासणारे कृत्य! सावत्र बापाचा तरूणीवर बलात्कार, आरोपी अटकेत)
ट्विट
दरम्यान, बुधवारी सोशल मीडियावर कथित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, मौगंज पोलिस स्टेशन हद्दीतील ढेरा गावात आरोपीचे घर बुलडोजर लावून पाडण्यात आले आहे. मौगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी श्वेता मौर्य यांना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
ट्विट
ट्विट
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत एक ट्विट केले आहे. त्यांनी इंग्रजीत केलेल्या ट्विटचा मराठी भावार्थ असा की, रीवा जिल्ह्यातील मौगंज भागात एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंकज त्रिपाठी या गुन्हेगाराला अटक करून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. तसेच, चालक पंकजचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या भूमीवर महिलांवर अत्याचार करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.