Yogi Adityanath Oath Ceremony: योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; उपस्थितीसाठी अखिलेश यादव, मायावती यांनाही फोन
मुख्यमंत्री आदित्यनाथ आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ (Yogi Adityanath Oath Ceremony) घेत आहेत. त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.
उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणाऱ्या भाजपे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ (Yogi Adityanath Oath Ceremony) घेत आहेत. त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. योगी आदित्यनाथ यांचा आज दुपारी 4 वाजता शपथविधी पार पडत आहे. या सोहळ्याला देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदित्यनाथ यांचे राजकीय विरोधक समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) आणि बसपा प्रमुख मायावती (Mayawati ) यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी या दोघांना स्वत:हून या सोहळ्याचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हावाल्याने दिले आहे. पाठिमागील काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी अखिलेश यादव यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी म्हटले होते की, शपथविधीला मी जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण, मला बोलावलेच जाणार नाही. त्यामुळे योगींनी तर आता थेट फोन करुनच निमंत्रण दिल्याने या शपथविधीला अखिलेश यादव जाणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (हेही वाचा, Yogi Government 2.0: योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड; शुक्रवारी घेणार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ)
उत्तर प्रदेश राज्यातील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुख्यमंत्री योगी यांचा शपथविधी आज सायंकाळी 4 वाजता पार पडेल. ते पद आणि गोफनियतेची शपथ घेतील. शपथविधीसाठीच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथील लोकभवनात भाजप विधिंडळ पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवडण झाली. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित होते.