World's Most Polluted Capital: दिल्ली ठरली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी; 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 63 शहरे भारतात

शिकागो विद्यापीठाने विकसित केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' दाखवतो की, जर हवेची गुणवत्ता WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत असेल तर दिल्ली आणि लखनौच्या नागरिकांच्या आयुष्यात जवळजवळ दहा वर्षांनी वाढ होऊ शकते

Air Pollution control Measures | (Pic Courtesy: PTI)

गेल्या अनेक वर्षांपासून राजधानी दिल्लीच्या (Delhi) प्रदूषणाबाबत (Pollution)  चिंता व्यक्त केली जात आहे. आता डब्ल्यूएचओने (WHO) शहरातील प्रदूषण अहवाल प्रसिद्ध केला आहे. यूएन एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन एजन्सीने मंगळवारी जगभरातील शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची क्रमवारी जाहीर केली. या अहवालात राजधानी दिल्लीचा उल्लेख जगातील सर्वात प्रदूषित राजधानी असा करण्यात आला आहे. या अहवालातील प्रदुषणाबाबत 50 निकृष्ट दर्जाच्या शहरांपैकी 35 शहरे भारतातील आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालात भारतातील एकाही शहराने WHO मानकांची पूर्तता केलेली नसल्याचे दिसून येते.

2021 च्या ग्लोबल एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये 117 देशांमधील 6475 शहरांचा डेटा समाविष्ट करण्यात आला आहे. या अहवालात 20 ते 35 टक्के शहरी पीएम 2.5 प्रदूषण, वाहन प्रदूषण म्हणून नोंदवले गेले आहे. नवी दिल्लीत 2021 मध्ये पीएम 2.5 सांद्रता 14.6 टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2020 मध्ये पीएम 2.5 प्रति घनमीटर 84 मायक्रोग्रॅम वरून 96.4 मायक्रोग्राम प्रति घनमीटर पर्यंत वाढले आहे.

एअर क्वालिटी रँकिंगमध्ये भारताची राजधानी दिल्ली (85.5) सर्वात प्रदूषित शहर म्हणून पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ बांगलादेशची राजधानी ढाका (78.1) आणि तिसर्‍या क्रमांकावर आफ्रिका खंडातील चाडची राजधानी अन जमेना (77.6) आहे. या अहवालानुसार जगातील प्रदूषित शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर ताजिकिस्तानचे दुशान्बे, पाचव्या क्रमांकावर ओमानचे मस्कत, सहाव्या क्रमांकावर नेपाळचे काठमांडू, सातव्या क्रमांकावर बहरीनचे मनामा, आठव्या क्रमांकावर इराकचे बगदाद, नवव्या क्रमांकावर किर्गिस्तानचे बिस्केक आणि दहाव्या क्रमांकावर उझबेकिस्तानचे ताजिकिस्तान शहर आहे.

त्याचवेळी, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद प्रदूषणाच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, पाकिस्तानची राजधानी नवी दिल्लीपेक्षा स्वच्छ आहे. IQAir च्या अलीकडील डेटावर टिप्पणी करताना, ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी सांगितले की, हा अहवाल सरकार आणि महानगरपालिकांसाठी एक इशारा आहे. यावरून लोक धोकादायक प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात वार्षिक वाहन विक्री वाढण्याची अपेक्षा असल्याने त्याचा हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. (हेही वाचा: Cyclone Asani Update: असानी चक्रीवादळाचा धोका वाढला, अंदमान निकोबार येथे अनेक ठिकाणी पाऊस सुरु, NDRF कडून अलर्ट जारी)

दरम्यान, जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 63 शहरे भारतात आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. शिकागो विद्यापीठाने विकसित केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा 'लाइफ इंडेक्स' दाखवतो की, जर हवेची गुणवत्ता WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत असेल तर दिल्ली आणि लखनौच्या नागरिकांच्या आयुष्यात जवळजवळ दहा वर्षांनी वाढ होऊ शकते. भारतातील सर्वात स्वच्छ हवा तामिळनाडूमधील अरियालूर येथे मोजली जाते, परंतु ती देखील WHO च्या सुरक्षित पातळीपेक्षा तीनपट जास्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif