Assam Shocker: 'जादूटोणा' केल्याचा संशय, असममध्ये महिलेला जीवंत जाळले

संगिता काटी या महिलेवर सूरज बागवार नावाच्या शेजाऱ्याने हल्ला केला होता, ज्याने त्यांच्या निज बाहबरी गावाबाहेरून काही लोकांना आणले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी तिच्या पतीला बांधले आणि नंतर तिला जाळून टाकले.

Burns | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आसाममधील (Assam) सोनितपूर जिल्ह्यात (Sonitpur district) जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली 30 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून तिला जाळण्यात आले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) चार जणांना अटक केली आहे, तर अन्य दोघे अद्याप फरार असून, या दोघांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मधुरिमा दास यांनी दिली. (हेही वाचा - पत्नी, धनप्राप्तीसाठी तरुणाला विवस्त्र करुन पूजा; नंदूरबारमध्ये जादूटोणा)

संगिता काटी या महिलेवर सूरज बागवार नावाच्या शेजाऱ्याने हल्ला केला होता, ज्याने त्यांच्या निज बाहबरी गावाबाहेरून काही लोकांना आणले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी तिच्या पतीला बांधले आणि नंतर तिला जाळून टाकले. शेजार्‍यांमध्ये विविध मुद्द्यांवरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता आणि बागवारने तिच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप केला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement