Rajasthan Alwar Gangrape: नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप
तर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी म्हटले आहे की, घटनेतील एका आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित परिवाराकडून काही पैसेही वसूल केले आहेत. सर्व प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात IPC आणि SC/ST कायदा कलम 147, 149, 323, 341, 354B, 376(D) & 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Rajasthan Alwar Gangrape: एका महिलेवर तिच्या पतीच्या समोरच बलात्कार करुन या कृत्याचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याच घटना घडली आहे. राजस्थान (Rajasthan) राज्यातील अलवार (Alwar) येथे ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Video)झाल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले परंतु, पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नाही. उलट हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक झाली नसल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. पीडित पती पत्नी हे आपल्या दुचाकीवरुन लालवाडी येथून तालवृक्ष येथे निघाले होते. दरम्यान, हे दाम्पत्य थानागाजी-अलवार बायपास रस्त्यावर पोहोचले. या वेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच व्यक्तींनी त्यांचा रस्ता आडवला. पीडित पती-पत्नीला बंदी बनवले आणि ते त्यांना जवळच्या मातीच्या ढीगाऱ्याकडे घेऊन गेले. या ठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आरोपींनी बोलात्कार करत असतानाचे व्हिडिओ शुटींगही केले. त्यानंतर आरोपींनी घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास घडल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आरोपी हे 20 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. तसेच, आरोपींचे राजकीय व्यक्तिंशी लागेबांधे असल्याचीही चर्चा आहे. (हेही वाचा, वडिलांना झाडाला बांधून मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 नराधमांचे कृत्य)
दरम्यान, पीडित दाम्पत्याने 2 मे रोजी सामूहिक बलात्काराची तक्रार पोलिसांत दिली. दैनिक भास्करच्या हवाल्याने जनसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रार प्राप्त होऊनही पोलिसांनी 4 दिवसांपर्यंत काहीच हालचाल केली नाही. दरम्यान, आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल केला. यावरही पीडितेच्या कुटुंबीयांनी एसएसपी सोबत चर्चा करुन तक्रार दाखल केली. त्यानंतर एसएसपींनी दिलेल्या आदेशानंतर पोलीस यंत्रणा तपास कार्यात सक्रिय झाली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणत्याही आरोपीला किंवा संशयीत आरोपीला तब्यात घेण्यात आले नाही. पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही ठिकठिकाणी छापेमारी करतो आहोत. तर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी म्हटले आहे की, घटनेतील एका आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित परिवाराकडून काही पैसेही वसूल केले आहेत. सर्व प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात IPC आणि SC/ST कायदा कलम 147, 149, 323, 341, 354B, 376(D) & 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.