Work Criminal Case Against Former CFO: Wipro कंपनीकडून Former CFO Jatin Dalal यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू, प्रकरण लवादाकडे पाठवायचे का? यावर न्यायालय घेणार निर्णय

विप्रो कंपनीने त्यांचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ), जतिन दलाल (Former CFO Jatin Dalal Of Wipro ) यांच्यावर बेंगळुरू दिवाणी न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

Wipro (PC - Facebook)

Wipro Sues Former CFO Jatin Dalal: विप्रो कंपनीने त्यांचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ), जतिन दलाल (Former CFO Jatin Dalal Of Wipro ) यांच्यावर बेंगळुरू दिवाणी न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईवर प्रत्युत्तरादाखल दिलेल्या उत्तरात दलाल यांनी एक अर्ज दाखल करत हे प्रकरण लवादाकडे पाठविण्याची विनंती केली आहे. कंपनी आणि माजी सीएफओ यांच्याती वादाचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. त्यामुळे भारतातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनी असलेल्या विप्रोतील या वादाने भारतातील आयटी विश्वात खळबळ उडाली आहे.

विप्रो आणि जतिन दलाल दोघांकडून परस्परांविरुद्ध युक्तिवाद

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विप्रो आणि जतिन दलाल या दोघांनीही सध्या सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांचे युक्तिवाद सादर केले आहेत. पुढील सुनावणी 3 जानेवारीला होणार आहे. या सुनावणीदरम्यान, विवाद लवादाकडे पाठवायचा किंवा नाही याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. न्यायालय या वादाचे निराकरण करण्यासाठी पर्यायी मार्ग सुद्धा देऊ शकेल. जी पारंपारिक न्यायालयीन कामकाजाच्या तुलनेत सुव्यवस्थित आणि खाजगी प्रक्रिया असू शकते. दरम्यान, हे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया आणि डिजिटल मीडियाने दिलेल्या वृत्तावर आधारीत आहे. लेटेस्टली मराठीने या खटल्याच्या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी अद्याप केली नाही. (हेही वाचा, Wipro Work From Office: विप्रो कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येणे बंधनकारक; 15 नोव्हेंबरपासून नियम लागू)

अपर्णा अय्यर विप्रोच्या नव्या सीएफओ

दरम्यान, विप्रोने नियामक फाइलिंगद्वारे दलाल यांच्या सीएफओ पदाचा राजीनामा सप्टेंबरमध्ये जाहीर केला. तसेच, अपर्णा अय्यर यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती केली. दलाल हे 2015 पासून विप्रोमध्ये CFO म्हणून काम करत होते आणि सांगितले जाते की, जवळपास 21 वर्षे ते विप्रोमध्ये सक्रीय होते. त्यांना 30 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या सेवांमधून मुक्त करण्यात आले. IT क्षेत्रातील अनुभवी अधिकारी दलाल यांच्यावर विप्रोच्या कायदेशीर कारवाईमागील कारणे अद्याप पुढे आले नाहीत. विप्रोमधून बाहेर पडल्यानंतर, दलाल यांनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजीमध्ये सीएफओ म्हणून सप्टेंबरमध्ये जबाबदारी स्वीकारली. (हेही वाचा, World's Best Companies of 2023: TIME ने जाहीर केली जगातील सर्वोत्तम कंपन्यांची यादी; Infosys टॉप 100 मध्ये, Wipro आणि Mahindra कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या)

विप्रोकडून आणखी एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

दरम्यान, विप्रोने त्यांचे माजी वरिष्ठ कार्यकारी मोहम्मद हक यांच्या विरोधातही औपचारिक तक्रार दाखल केल्याचे समजते. तक्रारीत हकच्या रोजगार करारामध्ये अंतर्भूत नसलेल्या स्पर्धक कलमाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हक, पूर्वी विप्रोमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जे पुढे कॉग्निझंटमध्ये जीवन विज्ञानासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय युनिट प्रमुखपद स्वीकारण्यासाठी निघून गेले.

एक्स पोस्ट

विप्रो कंपनी

विप्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार आहे. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान, सल्लागार आणि व्यवसाय प्रक्रिया सेवा प्रदान करते. भारतातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक म्हणून या कंपनीकडे पाहिलेजाते. भारतीय शेअर बाजारातही या कंपनीची कामगिरी चांगली असून, आकर्षक परतावा देणारी कंपनी म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. क्लाउड कॉम्प्युटिंग, संगणक सुरक्षा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या अनेक सेवा ही कंपनी देते. कंपनी जवळपास 167 देशांमध्ये काम करते आणि आपल्यासेवापुरवते.