Assembly Election Results 2024 On ABP News: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसह निवडणूक अधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहोचतील. त्याच वेळी, मतदान अधिकारी सकाळी 6 वाजेपर्यंत आपापल्या मतमोजणी टेबलवर तैनात होतील.
Assembly Election Results 2024 On ABP News: जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana And Jammu Kashmir Assembly Election 2024 Results) आज म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. याआधी पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 25 सप्टेंबरला झाले होते. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामुळे मतदार निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तथापी, 5 ऑक्टोबर रोजी हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 90 जागांवर मतदान झाले. यावेळी हरियाणात काँग्रेसने सीपीएमसोबत 90 जागा लढवल्या असून एक जागा सीपीएमला दिली आहे. तर भाजपने 89 जागांवर निवडणूक लढवली आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सर्व 90 जागांवर निवडणूक लढवली आहे. अधिकृत वृत्तानुसार, सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसह निवडणूक अधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहोचतील. त्याच वेळी, मतदान अधिकारी सकाळी 6 वाजेपर्यंत आपापल्या मतमोजणी टेबलवर तैनात होतील.
येथे पहा जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह स्ट्रिमिंग -
तुम्हाला एबीपी लाइव्ह टीव्ही, एबीपी हिंदी आणि इंग्रजी वेबसाइट आणि एबीपी नेटवर्कच्या यूट्यूब चॅनेलवर मतमोजणीशी संबंधित क्षणोक्षणी अपडेट्स मिळतील. याशिवाय एबीपी न्यूजच्या सोशल मीडिया हँडलवर जाऊन तुम्ही मतमोजणीचे निकाल जाणून घेऊ शकता.
लाईव्ह टीव्ही: https://news.abplive.com/live-tv
एबीपी लाईव्ह (इंग्रजी): https://news.abplive.com/
एबीपी न्यूज (हिंदी): https://www.abplive.com/
एबीपी नेटवर्क YouTube: https://www.youtube.com/watch?v=nyd-xznCpJc
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही एबीपी न्यूजवर पाहू शकता. हरियाणात 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला हॅट्ट्रिकची आशा आहे, तर 10 वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेली काँग्रेस राज्यात स्थान मिळण्याची आशा आहे. या निवडणुकीत मुख्य लढत या दोन पक्षांमध्ये आहे.